26 December 2024 5:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Gratuity on Salary | 15 वर्षांची नोकरी आणि शेवटचा पगार रु.75000, तुम्हाला ग्रॅच्युइटीची किती रक्कम मिळेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 5 लाख रुपये परतावा
x

Special Recipe | आरोग्यासाठी लाभदायक गुळपोळी | वाचा सविस्तर

Gul Poli recipe

मुंबई, ०९ जून | पारंपारिक पद्धतीने तयार करण्याती येणारी गुळपोळी आपल्या सर्वांनाच आवडते. काही खास सणांसाठी हा पदार्थ तयार केला जातो. ही गुळपोळी फक्त चवीलाच उत्तम नाहीतर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. गहू आणि गुळापासून तयार करण्यात आलेली ही हाय फायबर पोळी शरीरामधील आयर्नची कमतरता भासू देत नाही. तुम्ही ही पोळी तयार करताना तूप लावू शकता. जाणून घेऊया गूळपोळी तयार करण्याची पद्धत..

लागणारे साहित्य:
सारणासाठी, दीड कप शेंगदाणे, दीड कप खसखस दीड कप तेल, दीड किलो गूळ, एक कप बेसन, दोन सुक्या नारळाच्या वाट्या, ३/४ कप पांढरे तिळ, दिड कप मैदा, ३/४ कप कणिक, दोन टेस्पून तेल, चिमूटभर मिठ, दोन टेस्पून बेसन.

कृती:
चवीला छान आणि सुंदर अशी गुळपोळी बनवण्यासाठी स्टेप बाय स्टेप कृती करा.

  1. नारळाच्या वाट्या किसून घ्याव्यात. सोनेरी रंग येईपर्यंत कोरडेच भाजावे. हाताने चुरून घ्यावे. हा चुरा आपल्याला १/२ ते ३/४ कप हवा आहे.
  2. शेंगदाणे भाजून त्याची साले बाजूला करावीत आणि बारीक कूट करून घ्यावा.
  3. तिळ व खसखस स्वतंत्र, कोरडेच भाजून घ्यावे. बारीक पूड करून घ्यावी
  4. एका मध्यम पण जाड बुडाच्या पातेल्यात दीड कप तेल गरम करावे. त्यात एक कप बेसन खमंग भाजून घ्यावे.
  5. गूळ बारीक किसणीवर किसून घ्यावा. सर्व भाजलेल्या गोष्टी तिळ, खसखस, शेंगदाणे, बेसन, सुकं खोबरं गूळामध्ये घालून मळून घ्यावे आणि घट्ट गोळा करावा.
  6. मैदा, कणिक, मिठ आणि बेसन एकत्र करावे. दोन टेस्पून तेल कडकडीत गरम करून पिठात घालावे. पाणी घालून मध्यमसर घट्ट गोळा भिजवावा. लागल्यास थोडे साधे तेल घालावे. १५ मिनीटे झाकून ठेवावे.
  7. सारणाचे २३ ते २५ सारख्या आकाराचे गोळे करून घ्यावे.
  8. आवरणासाठी आपल्याला ‘एक सारण गोळ्याला दोन पिठाचे गोळे’ हवे आहेत त्यानुसार सारणाच्या गोळ्यापेक्षा जरा लहान असा पिठाचा गोळा करावा.
  9. दोन पिठाच्या लाट्यामध्ये एक सारणाचा गोळा भरून लाटीच्या कडा सिल करून बंद करावा. हाताने हलके दाबून थोड्या कोरड्या पिठावर पोळी लाटावी. गुळाची पोळी एका बाजूनेच लाटावी, बाजू पलटू नये.
  10. मध्यम तवा तापवून दोन्ही बाजू खरपूस भाजून घ्याव्यात. कागदावर काढून किंचीत गार होवू द्याव्यात. एकदम गरम खावू नये, सारणातील गूळ गरम असल्याने चटका बसू शकतो.
  11. गुळपोळी गार किंवा कोमट दोन्हीप्रकारे छान लागते. गुळपोळीवर नेहमी थोडे तूप घालून खावे म्हणजे उष्ण पडत नाही.

फायदे:
गुळपोळीतून भरपूर कॅलरीज मिळतात. कमी खाल्ले तरी शक्ती भरपूर मिळते. प्रतिकारशक्ती वाढते. शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत होते. अशक्तपणा कमी होतो. थंडीत खायला मजा येते. आरोग्याला लाभदायक असते.

 

News English Summary: We all love the traditional way of making gulpoli. This dish is made for some special festivals. This sweetness is not only good for taste but also very beneficial for health. This high fiber bread made from wheat and jaggery does not cause iron deficiency in the body. You can add ghee while making this poli.

News English Title: Gul Poli recipe jaggery bread iron deficiency will be removed health news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x