26 December 2024 11:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर कमाई होईल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPCGREEN Bonus Share News | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला तुफान गर्दी - NSE: SURYAROSNI IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK
x

Special Recipe | घराच्या घरी असे बनवा खमंग काकडीचे थालीपीठ

Kakadichi Thalipith recipe in Marathi

मुंबई, ०७ जुलै | महाराष्ट्रीयन स्पेशिअलिटी पदार्थ म्हंटले की आपल्याला जे पदार्थ आठवतात त्यांपैकी एक म्हणजेच थालीपीठ. थालीपीठ हा एक महाराष्ट्रीयन अन्नपदार्थ असून तो पौष्टिक देखील आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांचा थालीपीठ हा आवडीचा अन्न पदार्थ आहे.आणि हल्ली तर बरेच नॉन महाराष्ट्रीयन लोक देखील थालीपीठ चवीने खातात. ग्रामीण भागात थालीपीठाला धपाटे असे देखील म्हंटले जाते. थालीपीठ दोन प्रकारचे असते,एक म्हणजे भाजणी पासून बनवलेले थालीपीठ आणि दुसरे म्हणजे इन्स्टंट डायरेक्ट घरातील पीठांचे थालीपीठ.

लागणारे घटक:
* 2 काकड्या
* 2 टेबलस्पून आले-लसूण-मिरची-जीरे पेस्ट
* 1 कप कणिक
* 1/2 कप तांदळाचे पीठ
* 1 टेबलस्पून तिखट
* 1 टीस्पून हळद
* चवीनुसार मीठ
* थोडे पाणी
* तेल

संपूर्ण कृती:
* सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून किसून घ्यावी.
* काकडीच्या कीसमध्ये आले-लसूण-मिरची-जीरे पेस्ट आणि कणिक टाकावी.
* त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ आणि थोडे पाणी घालून सर्व साहित्य मिक्स करून बॅटर बनवून घ्यावे. (बॅटर जास्त पातळ बनवू नये)
* आता बॅटर मध्ये हळद आणि तिखट टाकावे.
* त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून बॅटर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
* नॉनस्टिक तव्यावर काकडीचे बॅटर टाकून चमच्याने गोलाकार पसरवून घ्यावे. थालीपीठ च्या किनारला थोडे तेल सोडून थालीपीठ दुसऱ्या बाजूने पलटवून खरपूस भाजून घ्यावा.
* सर्व्हिंग प्लेट मध्ये घेऊन गरमागरम काकडीचे थालीपीठ सर्व्ह करावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Kakadichi Thalipith recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x