20 April 2025 9:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

Special Recipe | झणझणीत खान्देशी डुबुक वडे बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी

Khandeshi Dubuk Vade recipe

मुंबई, २८ जुलै | केवळ उत्तर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खान्देशी खिचडी ही स्वादिष्ट अशी डिश आहे. खरे तर ही खान्देशी खिचडी, पण आता पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झाली आहे.खान्देशी खिचडी बनविण्यास खूपच सोप्पी आहे. आम्ही सांगितल्याप्रमाणे खान्देशी खिचडी करून पहा.

तर्री मसाला साहित्य:
* 2 मोठे कांदे (उभे चिरलेले)
* 1 सुक्या खोबऱ्याची वाटी (चिरुन किंवा किसून)
* १०-१२ लसूण पाकळ्या
* ८-१० कडिपत्ता पाने
* 3-4 इंच आल्याचे तुकडे
* 3 पळी तेल
* 2 टेबलस्पून खानदेशी काळा मसाला (रेडीमेड उपलब्ध)
* 1 टेबलस्पून लाल तिखट
* 1/4 टेबलस्पून हळद

डुबुक-वडे साहित्य:
* 1 कप बेसन
* 1/4 टीस्पून हळद
* 1/4 टीस्पून ओवा
* आवश्यकतेनुसार पाणी

इतर साहित्य:
* 2 कप गरम पाणी
* 1/2 कप चिरलेली कोथिंबीर
* चवीनुसार मीठ

संपूर्ण कृती:
१. प्रथम एका पॅनमध्ये कांदे खरपूस भाजून घ्यावे. मग त्यात खोबरं घालून चांगले भाजून घ्यावे. (इथे आख्खे कांदे आणि खोबऱ्याची वाटी डायरेक्ट गॅसवर सुध्दा भाजून घेता येतील.)

२. कांदा-खोबरं भाजून झाल्यावर, गॅस बंद करुन मग त्यात आलं, लसूण पाकळ्या आणि कडिपत्ता पाने मिसळून मिश्रण थंड होऊ द्यावे.

३. मसाला मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून त्याची पेस्ट करुन ठेवावी.

४. आता डुबुक-वड्याचे मिश्रण तयार करण्यासाठी, एका भांड्यात बेसन, हळद, ओवा व थोडे मीठ घेऊन बॅटर तयार करावे. (बॅटर खूप पातळ बनवू नये.)

५. आता एका कढईत तेल गरम करुन त्यात वाटलेला मसाला परतून घ्यावा, मग त्यात लाल तिखट, काळा मसाला, हळद आणि थोडी कोथिंबीर घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. (मसाला परतून होईपर्यंत, दुसरीकडे २ कप पाणी गरम करायला ठेवावे.)

६. मसाला छान परतून झाला की, आता त्यात गरम पाणी घालून चांगले उकळू द्यावे.

७. तर्री चांगली उकळली की, त्यात बेसनच्या बॅटरचे मध्यम आकाराचे वडे हाताने किंवा चमच्याने हलकेच सोडावे. सर्व वडे तर्री मध्ये सोडल्यावर, मंद आचेवर साधारणतः १०-१५ मिनीटे तर्री खळखळ उकळू द्यावी आणि नंतर गॅस बंद करुन त्यात कोथिंबीर गार्निश करावी. (बेसनचे गोळे तर्रीमधे सोडताना येणाऱ्या *डुबुक* आवाजावरुन या रेसिपीला हे नाव मिळाले असावे.)

८. गरमागरम डुबुक-वडे भाकरी, भात, पराठे यासोबत सर्व्ह करावे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Recipe Title: Khandeshi Dubuk Vade recipe in Marathi news updates

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या