31 January 2025 11:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँडसह डिटेल्स जाणून घ्या Bonus Share News | या कंपनीकडून फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा, मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, फायदा घ्या - NSE: GREENLAM 1 February Rules Alert | पुढील महिन्यापासून बदलणार 'हे' 5 नियम, तुमच्या खिशावर अधिक भार पडणार, लक्षात ठेवा Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या 'या' टॉप 5 लार्ज कॅप फंडांच्या योजना सेव्ह करा, करोडोत मिळतोय परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट तेजीत, मालामाल करणार एनर्जी स्टॉक, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा पॉवर शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | मजबूत फंडामेंटल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE
x

Special Recipe | नक्की ट्राय करा 'कुल्हडवाली खीर'

Special recipe, Kulhadwali Kheer, Festivals

मुंबई, १५ फेब्रुवारी: पुरणपोळी आणि कटाच्या आमटीशिवाय मराठी सण उत्सव अपूर्णच नाही का? मात्र तुम्हाला यापेक्षाही काही वेगळं तयार करून पाहायचं असेल तर तुम्ही ‘कुल्हडवाली खीर’ नक्की तयार करुन पाहू शकता. कुल्हड म्हणजेच मातीपासून तयार केलेला पेला. यात ठेवलेल्या खिरीची चवही काहीशी वेगळी आणि स्वादिष्ट असते. चला तर पाहू ‘कुल्हडवाली खीर’ची पाककृती

साहित्य:

  • मातीचे कुल्हड
  • १ लीटर दूध
  • दीड कप तांदूळ
  • ४ टी स्पून सुका मेवा
  • अर्धा चमचा केसर
  • साखर
  • लहान चमचा वेलची पावडर

पाककृती:

  • कुल्हड पाण्यात भिजवून एका बाजूला ठेवून द्या. तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवून घ्या.
  • एका भांड्यात दूध उकळत ठेवा. दूध उकळू लागलं की त्यात तांदूळ घाला. मंद आचेवर दूधात तांदूळ शिजवून घ्या. त्यात साखरही टाका.
  • हे मिश्रण चमच्यानं चांगलं ढवळून घ्या. त्यानंतर यात ड्राय फ्रूट्स घाला. पाच मिनटं मिश्रण चांगलं परतून घ्या. त्यात केसर आणि वेलची पावडर टाकून मिश्रण एकजीव करून घ्या.
  • हे मिश्रण थंड झालं की कुल्हडमध्ये भरा आणि काही वेळ फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या. ड्राय फ्रूट्स घालून सर्व्ह करा.

 

News English Summary: Isn’t Marathi festival incomplete without Puranpoli and Kata Amti? But if you want to try something different than this, you can definitely try ‘Kulhadwali Kheer’. An ax is a glass made of clay. The taste of Khiri in it is somewhat different and delicious. Let’s see the recipe of ‘Kulhadwali Kheer’.

News English Title: Special recipe of Kulhadwali Kheer for festivals news updates.

हॅशटॅग्स

#Recipe(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x