25 December 2024 11:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

Special Recipe | पारसी रेसिपी 'चिकन फरचा'

Special recipe, Parsi community, Chicken Farcha

मुंबई, २० फेब्रुवारी: पारसी समाजाच्या घरात अनेक पक्वान्न तयार केली जातात. यात ‘पात्रा नी मच्छी’, ‘कटलेट’, ‘साली गोटी’, ‘चिकन फरचा’ ‘कस्टर्ड’ यांसारख्या अनेक लज्जतदार पदार्थांचा समावेश असतो. त्यात सामान्य लोकांमध्ये सर्वात पसंतीची असलेली पारसी रेसिपी म्हणजे ‘चिकन फरचा’

चिकन फरचा:
साहित्य : बोनलेस चिकन, १ छोटा चमचा आलं पेस्ट, १ छोटा चमचा लसूण पेस्ट, दीड चमचा गरम मसाला, काळी मिरी पावडर स्वादानुसार, अर्धा चमचा धणे पूड, १ छोटा चमचा मिरची पावडर, दोन मोठे चमचे लिंबाचा रस, २ अंडी, तळण्यासाठी तेल आणि चवीनुसार मीठ, चार मोठे चमचे ब्रेड क्रम्स

कृती:

  • चिकनच्या तुकड्यांना आलं- लसूण पेस्ट, मीठ, लिंबाचा रस, मिरची पावडर, गरम मसाला, धणे पावडर, मिरपूड लावून चांगलं मॅरिनेट करून घ्यावं. चिकन तासभर तरी चांगलं मॅरिनेट करून घ्यावं.
  • एका मोठ्या भांड्यात अंडी फेटून घ्यावीत. अंड्यामध्ये चीवनुसार मीठ, मिरपूड आणि थोडीशी मिरची पावडर टाकावी.
  • तेल चांगलं गरम करून घ्यावं.
  • मॅरिनेट केलेल्या चिकनच्या तुकड्यांना ब्रेड क्रम्स लावावे. त्यानंतर चिकनचे तुकडे अंड्याच्या मिश्रणात घोळवून तेलात डिप फ्राय करावे.

 

News English Summary: Many dishes are prepared in the house of the Parsi community. It contains many flavors like Patra Ni Machchi, Cutlet’, Sali Goti, Chicken Farcha and Custard. The most popular Parsi recipe among the common people is ‘Chicken Farcha’.

News English Title: Special recipe of Parsi community Chicken Farcha news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x