22 April 2025 2:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Special Recipe | घरच्या घरी करा दाबेली मसाला | बनवा चविष्ट दाबेली

Kacchi Dabeli masala

मुंबई, २७ जून | स्ट्रीट फूड मध्ये प्रसिद्ध असणारा दाबेली हा प्रकार कोणाला आवडत नाही असं होणारच नाही. दाबेली म्हटली की तोंडाला पाणीच सुटते. गरमागरम बटरवर भाजलेली दाबेली आणि त्यावर मुरमुरीत शेव आणि तिखट शेंगदाणे हे नुसतं आठवलं तरी आता लगेचच खावीशी वाटते. बऱ्याच जणांना दाबेली घरी बनवता येते असं वाटतंच नाही. पण तुम्ही घरच्या घरी दाबेलीचा मसाला बनवून अप्रतिम चविष्ट अशी दाबेली बनवू शकता. या लेखातून खास तुमच्यासाठी आम्ही दाबेली रेसिपी आणि दाबेलीचा मसाला आणली आहे. तुम्हीही घरच्या घरी मस्तपैकी दाबेलीचा मसाला तयार करून घरगुती दाबेली बनवून अगदी स्ट्रीट फूड दाबेलीचा स्वाद घेऊ शकता.

दाबेलीचा मसाला बनविण्याची पद्धत:
कच्छी दाबेलीचा मसाला असा तर बाजारात तयार मिळतो. पण तुम्हाला बाजारातील मसाला नको असेल आणि घरात बनवायचा असेल तर तुम्ही घरच्या घरी दाबेलीचा मसाला कसा बनवायचा याची आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत. त्यासाठी आधी लागणारे साहित्य आपण जाणून घेऊ.

साहित्य:
* अर्धा कप धने
* 4 चमचे जिरे
* 2 चमचे बडिशेप
* 6 लवंगा
* 2 चमचे काळीमिरी
* 2 इंचाचा दालचिनीचा तुकडा
* 4 मोठ्या वेलची
* 4 चक्रीफूल (दगडफूल)
* 4 तमालपत्र
* अर्धा कप सुक्या नारळाचा किस
* 6 सुक्या मिरच्या तुकडे करून
* 1 चमचा तीळ
* 2 चमचे काळे मीठ
* 4 चमचे काश्मिरी लाल तिखट पावडर
* 2 चमचे साखर
* 2 चमचे तेल

मसाला बनविण्याची पद्धत:

* दाबेलीचा मसाला बनविण्यासाठी सर्वात आधी एका नॉनस्टिक पॅनमध्ये धणे, जिरे, बडिशेप, लवंग, तमालपत्र, काळी मिरी, दालचिनी, दगडफूल, मोठी वेलची सर्व एकत्र करा आणि भाजा. साधारण 1-2 मिनिट्स मध्यम आचेवर हे भाजून घ्या. भाजून झाल्यावर एका ताटात काढून ठेवा

* नंतर त्याच पॅनमध्ये सुक्या नारळाचा किस, लाल मिरच्या, तीळ घालून पुन्हा हे मिश्रण मध्यम आचेवर भाजून घ्या आणि ते त्याच ताटात बाजूला काढून ठेवा

* हे दोन्ही थंड झाल्यावर त्यात काळे मीठ आणि लाल मिरची पावडर मिक्स करा. हे सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या

* एका मोठ्या भांड्यात हा मसाला काढून घ्या आणि त्यात तेल आणि साखर मिक्स करून व्यवस्थित मिश्रण करून घ्या. तुमचा दाबेली मसाला तयार आहे. हा एअर कंटेनरमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा आणि त्याचा तुम्हाला हवा तेव्हा बाहेर काढून वापर करा.

दाबेली बनविण्यासाठी लागणारे साहित्य:
दाबेलीचा मसाला कसा बनवायचा ते आपण पाहिले. आता त्या मसाल्याचा वापर करून दाबेली कशी बनवायची याचीदेखील रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य:
* 6 दाबेलीचे पाव
* 4 मोठे बटाटे (उकडलेले)
* 1 चमचा लाल तिखट
* 2 चमचे दाबेली मसाला
* 1 कांदा बारीक चिरून
* 2 चमचे कोथिंबीर बारीक चिरून
* 3 चमचे डाळिंबाचे दाणे
* 3 चमचे मसाला शेंगदाणे
* चवीनुसार मीठ
* बटर (मस्का)
* 1 चमचे बारीक शेव
* 1 चमचे गोड चटणी (खजूर चटणी)
* 2 चमचे हिरवी तिखट चटणी (कोथिंबीर – पुदीना चटणी)
* 2 चमचे तेल

बनविण्याची पद्धत:

* सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य एकत्र करून घ्या. उकडून घेतलेले बटाटे मॅश करून घ्या. यामध्ये जास्त मोठे तुकडे ठेऊन नका

* आता एका कढईत तेल गरम करून त्यात दाबेली मसाला, मीठ आणि लाल मिरची पावडर घालून हा मसाला बारीक गॅसवर परतून घ्या.आता त्यात उकडलेले बटाटे घालून व्यवस्थित एकजीव करुन घ्या. मसाला यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला आहे आणि मिठाची चव व्यवस्थित आहे की नाही याची चव घेऊन खात्री करा

* तयार झालेले बटाट्याचे मिश्रण एका ताटात काढून पसरवून घ्या.त्यात इतर पदार्थ म्हणजे चिरलेला कांदा, डाळिंबाचे दाणे, मसाल्याचे शेंगदाणे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला

* आता दाबेलीचा पाव एका बाजूने थोडा कापून पावात एका बाजूने गोड चटणी आणि दुसऱ्या बाजूला तिखट हिरवी चटणी लावा. त्याच्या वर तयार केलेले बटाट्याचे मिश्रण व्यवस्थित पसरवा. तुम्हाला हवं असल्यास यात चीज किसून घाला

* वरीलप्रमाणे सगळे दाबेलीचे पाव भरुन घ्या. आता तवा गरम करून त्यावर पहिले बटर लावा. दाबेली दोन्ही बाजूंनी बटर वर भाजून घ्या. भाजून झाले की दाबेलीच्या सर्व बाजूने बारीक शेव लावा आणि त्यावर डाळिंबाचे दाणे आणि मसाला शेंगदाणे आणि कोथिंबीर वरूनही घाला

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Special recipe on Kacchi Dabeli masala article news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या