Special Recipe | घरच्या घरी तयार करा स्ट्रॉबेरी शॉर्ट लेयर पेस्ट्री
मुंबई, १५ फेब्रुवारी: असं म्हणतात कोणत्याही व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहचण्याचा रस्ता पोटातून जातो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही स्वत: तयार केलेला छान, चविष्ठ पदार्थ समोरच्या व्यक्तीचं मन सहज जिंकू शकतं. त्यामुळे व्हॅलेंटाइन डेला तुम्हाला थोडीशी मेहनत घेऊन आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी काही वेगळं तयार करायचं असेल तर स्ट्रॉबेरी शॉर्ट लेयर पेस्ट्री हा पर्याय तुम्ही ट्राय करु शकता.
केकसाठी:
- १ कप अन सॉलल्टेड बटर (मीठ नसलेला)
- २ कप पीठी साखर
- ३ कप केकचे पीठ, चाळलेले
- १ चमचा बेकिंग पावडर
- अर्धा चमचा मीठ
- सव्वा कप दूध
- चार अंडी
- २ चमचे व्हॅनिला अर्क
पहिल्या लेअरसाठी:
- तुकडे केलेल्या ताज्या स्ट्रॉबेरीज
- २ चमचे पीठी साखर
- १ चमचा व्हॅनिला अर्क
दुसऱ्या लेअरसाठी:
- २ कप हेवी व्हिपिंग क्रीम
- १ चमचा व्हॅनिला अर्क
- पाव कप साखर
कृती:
- केक बनवण्यासाठी ओव्हन 350 अंशांवर प्रीहीट करा. केकसाठी आठ किंवा नऊ इंचीच्या गोलाकार भांड्याला पार्चमेंट कागद लावून घ्या. केक चिकटू नये यासाठी पार्चमेंट कागदावर थोडासा बटर आणि पीठ लावा.
- एका भांड्यात बटर, साखर सर्वाधिक वेगाने फिकट आणि क्रीमी होईपर्यंत तीन ते चार मिनिटे फेटून घ्या.
- मध्यम आकाराच्या भांड्यात केकचे पीठ, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करा. दुसऱ्या भांड्यात दूध, अंडी, व्हॅनिला अर्क एकत्र व्हिस्क करा. पिठाचे मिश्रण बटरच्या मिश्रणात 3 अडिशन्सह घाला. एकाआड एक दुधाचे मिश्रण आणि अखेरीस पिठाचे मिश्रण असा क्रम ठेवा. प्रत्यकवेळएस भर घालताना भांड्याच्या कडांना लागलेले मिश्रण काढून घ्या.
- हे मिश्रण आधी तयार केलेल्या केकसाठीच्या दोन भांड्यात विभागून काढा आणि वरचा भाग खरपूस सोनेरी होईपर्यंत आणि हलका स्पर्श केल्यानंतर वर येईपर्यंत म्हणजे किमान 30 ते 35 मिनिटे बेक करा. केक बाहेर काढून थंड करा नंतर केक फ्रिजमध्ये ठेवून थंड करून घ्या.
- केक सर्व्ह करताना कापलेल्या स्ट्रॉबेरीज, साखर आणि व्हॅनिला अर्क एका भांड्यात एकत्र करून 20 मिनिटे तसेच ठेवून द्या.
- व्हिप्ड क्रीम तयार करण्यासाठी इलेक्ट्रिक मिक्सरने व्हिपिंग क्रीम, साखर, व्हॅनिला अर्क मध्यम आकाराचे पिक्स तयार होईपर्यंत फेटा.
- थंड केलेले केकचे लेयर्स फ्रीजमधऊन काढा आणि लहान सुरीने प्रत्येक लेयरला आडवा छेद द्या. त्यानंतर करवतीप्रमाणे आरे असलेल्या मोठ्या सुरीने प्रत्येक लेयर आधी दिलेल्या छेदावरून कापून घ्या.
- केक प्लेटवर किंवा स्टँडवर केकचा एक लेयर ठेवा. एक कप व्हिप्ड क्रीमचा थर आणि स्ट्रॉबेरी मिश्रणाचा पाव भाग त्यावर लावा. केकचे बाकीचे लेयर्स, व्हिप्ड क्रीम आणि स्ट्रॉबेरीजसाठी या कृतीची पुनरावृत्ती करा.
- केक लगेच सर्व्ह करा.
News English Summary: It is said that the only way to reach a person’s heart is through the stomach. Simply put, a nice, tasty dish you make yourself can easily win the heart of the person in front of you. So if you want to make something different for your favorite person on Valentine’s Day with a little effort, you can try the strawberry short layer pastry.
News English Title: Special recipes home made strawberry short layer pastry news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार