31 January 2025 11:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
1 February Rules Alert | पुढील महिन्यापासून बदलणार 'हे' 5 नियम, तुमच्या खिशावर अधिक भार पडणार, लक्षात ठेवा Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणाऱ्या 'या' टॉप 5 लार्ज कॅप फंडांच्या योजना सेव्ह करा, करोडोत मिळतोय परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट तेजीत, मालामाल करणार एनर्जी स्टॉक, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा पॉवर शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER Reliance Share Price | मजबूत फंडामेंटल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, दमदार कमाई होणार, अपडेट सह टार्गेट प्राइस नोट करा - NSE: VEDL Advik Capital Share Price | 2 रुपयांचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 11 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 539773
x

Special Recipe | पौष्टीक मेथी पुलाव घरच्या घरी बनवा - वाचा रेसिपी

Methi Pulao recipe in Marathi

मुंबई, ११ जुलै | घराच्या घरी बनविण्यासाठी अनेक रेसिपी उपलब्ध आहेत. त्यात बाहेरील अन्न पदार्थ खाऊन आरोग्याला हानी पोहोचविण्यापेक्षा घरातच चमचमीत पदार्थ बनवून देखील जिभेचे चोचले पुरविता येतात. मेथीची भाजी, पराठे तुम्ही नेहमीच खाल्ले असतील. मग आता मस्तपैकी मेथी पुलाव करून बघा.

एकूण साहित्य:
* दोन कप बासमती तांदूळ
* बारीक चिरलेली मेथी
* बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो
* आलं-लसूण पेस्ट अर्धा चमचा
* आठ ते दहा काजू
* लाल तिखट दोन चमचे
* थोडं जीरं
* गरम मसाला
* कढीपत्त्याची पाच ते सात पानं
* तेल आणि मीठ.

संपूर्ण कृती:
* सर्वात आधी भात शिजवून घ्या
* थोडा थंड होऊ द्या
* एका कढईत थोडं तेल घाला
* गरम झाल्यावर जीरं आणि कढीपत्ते घाला
* मग कांदा घालून परतून घ्या
* आलं-लसूण पेस्ट घाला
* यानंतर टोमॅटो घाला
* टोमॅटो शिजल्यावर त्यात तिखट आणि गरम मसाला घाला
* चवीनुसार मीठ घाला
* काजूही घाला
* थोडं तेल सुटल्यावर मेथी घाला
* मेथी पाच ते दहा मिनिटं झाकण ठेऊन शिजवून घ्या
* मेथी शिजल्यानंतर शिजवलेला भात घालून परतून घ्या
* कढईवर झाकण ठेऊन दोन मिनिटं शिजू द्या
* गॅस बंद करा
* मेथी पुलाव तयार आहे
* हा पुलाव रायत्यासोबत खाता येईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Spicy Methi Pulao recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x