20 April 2025 10:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

Special Recipe | चविस्ट लज्जतदार मुगलेट बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी

Moonglet recipe in Marathi

मुंबई, २१ जुलै | न्याहरीला पोहे, उपमा, शिरा, इडलीव्यतिरिक्त काय करावं, असा प्रश्न तुम्हालाही पडतो का, काहीतरी पौष्टिक पण चविष्ट असं काहीतरी हवं असतं का, मग तुम्ही मूगलेट करून बघा. हे मूगलेट म्हणजे मूगाचा चीला. हा पौष्टिक असा प्रकार तुम्हाला नक्कीच आवडेल.

संपूर्ण साहित्य:
* एक कप मूग
* आल्याचा छोटा तुकडा
* दोन हिरव्या मिरच्या
* ७ ते ८ कढीपत्त्याची पानं
* पाव चमचा मिरपूड
* थोडे जिरे आणि धनेपूड
* दोन चमचे ओलं खोबरं
* मीठ आणि तूप

स्टफिंगसाठी साहित्य:
* दोन बारीक चिरलेले कांदे
* बारीक चिरलेली कोथिंबिर
* किसलेलं पनीर
* मीठ आणि लाल तिखट

संपूर्ण कृती:
* मूग रात्रभर भिजवून सकाळी वाटून घ्या.
* वाटताना त्यात दोन हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, अर्धा कप पाणी, कढीपत्ते, मीठ घाला.
* वाटण तयार झाल्यावर यात कोरडे मसाले तसंच खोबरं घालून मिसळून घ्या.
* आता गॅसवर तवा ठेवा. त्यावर थोडं तेल घाला.
* तव्यावर मूगाचं पिठ घालून डोश्यासारखा गोल आकार द्या.
* फार पातळ करू करू नका. आवडत असल्यास थोडं जाडसरच ठेवा.
* त्यावर पनीरचं सारण पसरा. दोन्ही बाजूंनी नीट भाजून घ्या. गरमागरम खा.
* हे मूगलेट सॉस किंवा चटणीसोबत मस्त लागेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Spicy Moonglet with chutney recipe in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या