13 January 2025 11:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension | खाजगी नोकरी करणाऱ्यांनो, 10 वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला इतकी EPF पेन्शन मिळणार, रक्कम जाणून घ्या WhatsApp Update | चॅटिंगसाठी शेड्युल करा नवे इव्हेंट्स, व्हाट्सअपने आणलं एक अनोखं फीचर, व्हाट्सअप अपडेट तपासून पहा Bank Account Alert | 1 वर्षाची बँक FD, सर्वात जास्त परतावा कोणती बँक देईल, इथे जाणून घ्या योग्य माहिती, पैशाने पैसा वाढवा Property Knowledge | मालमत्ता खरेदी करताना 'हे' एक काम जरूर करा, रजिस्ट्री प्रॉपर्टी खरी आहे की खोटी ओळखायला शिका IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर 6 महिन्यात 40 टक्क्यांनी घसरला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRFC BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: BEL Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम्स शेअर रॉकेट तेजीत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - NSE: APOLLO
x

Special Recipe | चविष्ट अशी सुक्के बोंबील बटाटा भाजी या पावसाळ्यात खाऊन तर बघा

Tasty and yummy dried bombayduck and potato bhaji

मुंबई २४ मे : पावसाळ्याच्या दिवसात ताजे मासे कमीच मिळतात. म्हणून सुक्क्या मच्छीची काही जणांकडे सोय केलेली असते. सुक्की करंदी , बोंबील ,काड घोळ किंवा बांगड्याचे खारवलेले तुकडे असे नाना प्रकार सुक्क्या मच्छीचे असतात. पावसाळ्याच्या दिवस सुक्क्या माश्यांना विशेष चव येते . आज मी तुम्हाला सुक्के बोंबील आणि बटाटा भाजी कशी करायची ते सांगणार आहे . त्याचे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहे .

साहित्य :
५-६ सुक्के बोंबील ,
३-४ लसूण पाकळ्या ,
१ माध्यम आकाराचा कांदा ,
२-३ हिरव्या मिरच्या ,
३ टीस्पून चिंचेचा कोळ ,
१ टीस्पून हळद ,
३ टीस्पून घरगुती मसाला
२ टीस्पून तांदळाचे पीठ
चवीपुरतं मीठ
तेल
कोथिंबीर

कृती :-
१. प्रथम सुक्के बोंबील स्वछ धुवून त्यांचे दोन -तीन तुकडे करावेत. बटाट्याच्या फोडी कराव्या.
२. एका पातेल्यात तेल गरम करून त्यात कांदा ,मिरच्या आणि लसूण घालावा. परतल्यावर हळद आणि घरगुती मसाला घालावा.
३. मसाला व्यवस्थित परतल्यावर त्यात बोंबील आणि बटाटे घालावे आणि शिजण्यासाठी बेताचे पाणी घालावे .
४. बोंबील आणि बटाटे शिजल्यावर त्यात मीठ घालावे. गॅस कमी करून चिंचेचा कोळ घालावा.
५. रश्श्याला थोडा दाटसरपणा येण्यासाठी थोडे तांदळाचे पीठं घालावे आणि वरून कोथिंबीर घालावी

असा स्वादिष्ट बोंबील बटाटा रस्सा भाजी आपण चपाती किंवा भाताबरोबरही खाऊ शकतो .

News English Summary: Fresh fish is scarce on rainy days. So some people have access to dried fish. There are several types of dried fish, such as dry prawns, bombayduck, kad salaman or salted pieces of bangada. Dry fish has a special taste on rainy days. Today I am going to tell you how to make dried bombayduck and potato bhaji. Its material and action are as follows.

News English Title: Tasty and yummy bombayduck and potatos bhaji news update article

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x