26 December 2024 11:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांनो बिनधास्त गुंतवणूक करा, महिना SIP वर मिळेल 1 कोटी 25 लाख रुपये परतावा IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर कमाई होईल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPCGREEN Bonus Share News | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला तुफान गर्दी - NSE: SURYAROSNI IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA
x

Special Recipe | खमंग आणि चविष्ट सुक्के चिकन खाऊन तर बघा

Yummy and tasty dried chicken

मुंबई ३ मे : आपण चिकनचा रस्सा नेहमी खातो पण सुक्के चिकन खाण्यात सुद्धा मज्जा आहे.अत्यंत चविष्ट आणि खमंग अश्या सुक्क्या चिकनची पाककृती आपण खालीलप्रमाणे बघणार आहोत

साहित्य:
१ किलो चिकन
५-६ माध्यम आकारचे कांदे
३ टोमॅटो
१ टेबल स्पून आलं लसूण पेस्ट
१ टी स्पून हळद
३ टी स्पून गरम मसाला
१ टी लाल तिखट
१ टेबल स्पून चिकन मसाला
२ टी स्पून मालवणी मसाला ( आवश्यकतेनुसार)
१ लिंबू
चवीपुरतं मीठ
कोथिंबीर

कृती:
१. प्रथम एका पातेल्यात चिकन स्वछ धुवून घ्यावे. त्यात हळद ,मीठ ,आलं लसणाची पेस्ट ,लिंबू लावून १५-२० मिनिटे मुरत ठेवावे.
२. एका कढईमध्ये तेल घालून त्यात कांदा मऊ आणि गुलाबी होईपर्यंत परतावा.
३. परतलेल्या कांदयात टोमॅटो टाकून शिजवून घ्यावे .
४. नंतर त्यात मुरलेलं चिकन टाकावे आणि झाकण ठेवून ५-१० मिनिटे वाफवावे .
५. ५-१० मिनिटे झाल्यावर लाल तिखट,चिकन मसाला आणि आवश्यकतेनुसार मालवणी मसाला टाकून एकजीव करावे आणि पुन्हा चिकन २५-३० मिनिटे शिजवावे. गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे .
६. चिकन पूर्णपणे शिजल्यानंतर वरून कोथिंबीर पेरावी .

हे सुक्के चिकन पोळी किंवा तांदूळ -ज्वारीच्या भाकरी सोबत छान लागते

News English Summary: We always eat chicken broth but it is also fun to eat dried chicken.

News English Title: Yummy and tasty dried chicken news update article.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x