9 January 2025 11:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Alok Industries Share Price | रिलायन्स गृप कंपनीच्या 20 रुपयाच्या शेअर्सची जोरदार खरेदी, मालामाल करणार शेअर - NSE: ALOKINDS 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या EPF on Salary | तुमच्या पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात जमा होणार 2 कोटी 53 लाख रुपये, अपडेट जाणून घ्या Nippon India Mutual Fund | या 3 म्युच्युअल फंड योजना ठरतील मार्ग श्रीमंतीचा, मिळेल 1.02 कोटी रुपये ते 1.27 कोटी रुपये परतावा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Post Office Scheme | 5 लाखांची रक्कम गुंतवून 15 लाख कमवायचे आहेत, पोस्टाची 'ही' योजना करेल मदत, वाचा सविस्तर माहिती Railway Ticket Booking | रेल्वे तिकिट सोबत 'या' मोफत सुविधांचा लाभ तुम्ही घेताय ना, 99% प्रवाशांना माहित नाही
x

सर्व क्रिकेटर्स म्हणजे ‘धोबी का कुत्ता, घर का ना घाट का’ | कंगना रोहित शर्मावर भडकली

Actress Kangana Ranaut, Cricketer Rohit Sharma, Farmers protest

मुंबई, ०४ फेब्रुवारी: केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी गेल्या २ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, सरकार आणि शेतकऱ्यांच्या आतापर्यंत ११ चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु कृषी विधेयक मागे घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. यातच आता शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.

बारबाडोसमध्ये जन्मलेल्या रिहानानं शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विट केल्यानंतर भारतात देखील त्याचे पडसाद उमटले. यावरून अभिनेता अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, लता मंगेशकर, अजय देवगण आणि सायना नेहवालने ट्विट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर रोहित शर्मा सहित इतर क्रिकेटर्सनी देखील ट्विट केलं आहे.

यावर क्रिकेटर रोहित शर्माने देखील ट्विट करताना म्हटलं आहे की, “जेव्हा आपण एकजुटीने उभे असतो तेव्हा देश कायमच मजबूत राहिला आहे. कठीण प्रसंगात समस्येचा तोडगा काढणे ही पहिली गरज आहे. भारताच्या विकासात शेतकऱ्यांची नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. मला खात्री आहे की, आपण एकजुटीने नक्कीच या प्रश्नावर तोडगा काढू”, असं ट्विट रोहित शर्माने केलं होतं.

रोहित शर्माच्या या ट्विटवर रिप्लाय देताना अभिनेत्री कंगना रणौत चांगलीच संतापली आणि तिने जवळपास सर्वच क्रिकेटपटूंना धारेवर धरलं. हे सर्व क्रिकेटपटू धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशा स्वरुपात का बोलत आहेत?” शेतकरी त्यांच्याच भल्यासाठी करण्यात आलेल्या कृषी कायद्यांना विरोध का करतील? असा सवाल कंगनाने विचारलाय. तसेच, “हे दहशतवादी आहेत, आणि गोंधळ घालत आहेत. असं म्हणा ना की, ते दहशतवादी आहेत, भीती वाटते का ? असं उत्तर कंगनाने रोहितच्या ट्विटवर केलं आहे. कंगनाच्या या ट्विटवर रोहित शर्मा रिप्लाय देतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बघुया अन्य क्रिकेटपटुंनी काय प्रतिक्रिया दिली होती..

 

News English Summary: Replying to Rohit Sharma’s tweet, actress Kangana Ranaut got very angry and she caught almost all the cricketers on edge. Why are all these cricketers talking in such a manner, whether it is a laundry, a dog, a house or a ghat? ” Why would farmers oppose agricultural laws for their own good? That is the question asked by Kangana. Also, “These are terrorists, and they are making a fuss. Don’t say they are terrorists, are you scared?” Kangana replied to Rohit’s tweet. It will be important to see if Rohit Sharma responds to Kangana’s tweet. Let’s see what other cricketers do. What was the reaction.

News English Title: Actress Kangana Ranaut target cricketer Rohit Sharma after his tweet on farmers protest news updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x