21 February 2025 5:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Asia Cup 2023 Final | पाकिस्तानचा आजचा सामना रद्द झाल्यास अंतिम सामना भारत आणि श्रीलंकेत होणार, काय आहे अपडेट?

Asia Cup 2023 Final LIVE

Asia Cup 2023 Final | आशिया चषक 2023 मध्ये आज कोलंबोमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सुपर 4 नॉकआऊट सामना होणार आहे. जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत भारताशी खेळेल. परंतु ठरलेल्या वेळेला १ तास उलटूनही नाणेफेक झालेला नव्हता.

या महत्वाच्या सामन्यात पावसामुळे मोठा व्यत्यय आला आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ४ वाजेपर्यंत कोलंबोत पाऊस पडत होता आणि संपूर्ण मैदान झाकण्यात आले होते. सध्या या परिस्थितीमुळे पाकिस्तानचा तणाव वाढला आहे.

पाकिस्तान – नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

काही वेळाने पावसाने विश्रांती घेतली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यापूर्वी पाकिस्तानने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केल्यानंतर त्यात ही बदल केले आहेत. इमामला पाठदुखी आहे, तर सौद शकीलला ताप आहे. फखर झमान संघात कायम आहे. श्रीलंकेच्या संघातही बदल करण्यात आले आहेत. रजितायांच्या जागी प्रमोद मदुशान आणि दिमुथ करुणारत्ने यांच्या जागी कुसल जनिथ यांचा समावेश करण्यात आला आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक सुपर फोर सामन्याला गुरुवारी पावसामुळे उशीर झाला. हा सामना ४५-४५ षटकांचा असेल.

आज करो या मरो स्थिती

कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात हा सामना खेळला जात आहे. आजचा सामना जिंकणाऱ्या संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल. पण जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर त्याचा फायदा श्रीलंकेला होणार आहे. सुपर ४ मधील दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना आहे. दोन्ही संघांचे २-२ गुण आहेत. नेट रन रेटबद्दल बोलायचे झाले तर श्रीलंकेची स्थिती पाकिस्तानपेक्षा चांगली आहे. सामना झाला नाही तर दोन्ही संघांचे ३-३ गुण होतील, पण श्रीलंकेला रन रेटच्या आधारे फायनलमध्ये प्रवेश मिळेल. जिथे १७ नोव्हेंबरला त्याच मैदानावर त्याचा सामना भारताशी होणार आहे.

6:58 PM Pakistan vs Sri Lanka live score: सलामीवीर अब्दुल्ला शफीकने अर्धशतक झळकावले. त्याने 65 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. शफीकचे वनडेतील हे पहिलेअर्धशतक आहे.

6:50 PM Pakistan vs Sri Lanka live: आशिया कपमधील पहिला सामना खेळणाऱ्या अब्दुल्ला शफीकने अर्धशतकाच्या जवळपास पोहोचले आहे. पाकिस्तानने दोन गडी गमावले आहेत.

6:34 PM Pakistan vs Sri Lanka live: दुनिथ वेल्लागेने श्रीलंकेला मोठे यश मिळवून दिले आहे. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला बाद केले आहे. बाबर ३५ चेंडूत २९ धावांवर बाद झाला.

6:20 PM Pakistan vs Sri Lanka live score: पाकिस्तानने 14 षटकांत 1 गडी गमावून 63 धावा केल्या आहेत. बाबर आझम आणि शफीक यांनी दुसऱ्या विकेटसाठी 60 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे.

News Title : Asia Cup 2023 Final LIVE 14 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Asia Cup 2023 Final LIVE(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x