14 January 2025 5:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पैसे दुप्पट करणार 'हा' पेनी शेअर, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
x

बजरंग पुनिया आणि विनोद कुमारला कांस्यपदक : आशियाई कुस्ती स्पर्धा

नवी दिल्ली : भारताच्या कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनोद कुमारला यंदाच्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. विनोद कुमार ओमप्रकाशने ७० किलो फ्रीस्टाईल वजनी गटात आणि बजरंग पुनियाने ६५ किलो फ्रीस्टाईल वजनी गटात देशासाठी २ कांस्यपदकाची कमाई केली आहे. आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताने आता पर्यंत एकूण आठ पदकांची कमाई केली असून त्यात एक सुवर्ण, एक रौप्य आणि सहा कांस्य पादकांचा समावेश आहे.

गेल्यावर्षी भरलेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाने सुवर्णपदक कमावले होते. यंदा मात्र सुवर्ण पदक मिळविण्यात बजरंग पुनिया अपयशी ठरला असून, जपानच्या डायची टकाटनीने बजरंग पुनियाला ७-५ इतक्या फरकाने पराभूत केले आहे. त्यामुळे बजरंग पुनियाला यंदा कांस्य पदकावरच समाधानी रहावे लागले.

तर दुसरीकडे विनोद कुमारला उजबेगिस्तानच्या इख्तियार नवरोजने ६-३ असे पराभूत केले. यंदाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत नवज्योत कौरने ६५ किलो वजनी गटात आतापर्यंत भारतासाठी एक सुवर्णपदक पटकावून नवा इतिहास नोंदविला आहे. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी नवज्योत कौर ही पहिली महिला ठरली आहे.

हॅशटॅग्स

#Asian Wresting Championship 2018(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x