22 January 2025 1:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांची प्रकृती पुन्हा बिघडली

BCCI president Sourav Ganguly, Health Deteriorated

नवी दिल्ली, २७ जानेवारी: बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे. काल रात्रीपासून त्याला अस्वस्थ वाटत होतं. दरम्यान आज (२७ जानेवारी) दुपारी त्यांच्या छातीत थोडं दुखू लागलं. प्रकृती बिघडल्याने कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात गांगुलीला दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांच्या उपचारानंतर गांगुली घरी परतले होते. मात्र आज पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ग्रीन कॉरिडोर बनवून सौरव गांगुलीला त्याच्या बेहला येथील घरापासून अपोलो रुग्णालयापर्यंत नेण्यात आले. अपोलो रुग्णालयात डॉ. आफताब खान यांच्या देखरेखीखाली गांगुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तत्पूर्वी गांगुलीला हृदयाच्या त्रासामुळे वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. व्यायाम करत असताना त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली होती. त्यानंतर त्याच्या वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यात त्याला हृदयाचा विकार असल्याचे निष्पन्न झालं होतं.

 

News English Summary: BCCI president Sourav Ganguly’s health has deteriorated once again. He had been feeling unwell since last night. Meanwhile, this afternoon (January 27), his chest started to ache a little. Ganguly has been admitted to a private hospital in Kolkata due to ill health. Ganguly had returned home after a few days of treatment. However, he has been admitted to the hospital again today.

News English Title: BCCI president Sourav Ganguly’s health has deteriorated once again news updates.

हॅशटॅग्स

#BCCI Cricket(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x