23 February 2025 2:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

शेवटी खेळाडूंना कोरोना झालाच | नेहमीच लक्षात ठेवा, राजकुमाराने लोकांच्या जिवापेक्षा मनोरंजनला प्राधान्य दिले - काँग्रेस

Congress leader Srivatsa

नवी दिल्ली, ०४ मे | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अखेर आयपीएलचे पूर्ण सीझन स्थगित करण्यात आले आहे. 7 खेळाडूंसह काही स्टाफ मेंबर्सला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. अशात आयपीएलचे सीझन रद्द करावे अशी मागणी सगळीकडून केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट बोर्डाने आयपीएल सस्पेंड करण्याचा निर्णय घेतला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानात PSL ची सुरुवात झाली होती, पण 6 खेळाडूंसह 8 जण कोरोना संक्रमित झाले होते. तेव्हा पाकिस्तानने अचानक पीएसएल गुंडाळण्याचा निर्णय घेतला. पण, आयपीएलमध्ये 7 क्रिकेटर्सला कोरोना झाल्यानंतरही BCCI कसली वाट पाहत आहे असा सवाल उपस्थित केला जात होता. तत्पूर्वी आयपीएलचे सामने एकाच ठिकाणी मुंबईतील 3 मैदानांवर घेणार अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, वाढत्या दबावानंतर अखेर आयपीएलचे सीझन सस्पेंड करावे लागले आहे.

दरम्यान, या निर्णयानंतर काँग्रेसने अमित शहा आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना लक्ष केलं आहे. यासंदर्भात काँग्रेसचे नेते श्रीवत्सा यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “आयपीएलची सुरुवात ९ एप्रिलला दिल्ली, बंगळुरू आणि अहमदाबादला झाली होती… त्यापूर्वीच कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली होती आणि ती शहर लॉकडाऊन झाली होती पण आयपीएल सुरूच होती… शेवटी खेळाडूंना कोरोनाची लागण झालीच, आणि जय शहांचा फुगा फुटला… नेहमीच लक्षात ठेवा, राजकुमाराने लोकांच्या जीवनापेक्षा मनोरंजनला प्राधान्य दिले.

 

News English Summary: IPL started on Apr 9th in venues of Delhi, Bengaluru & Ahmadabad. 2nd wave had already started & these cities went to into lockdown & yet IPL continued. Finally players became positive & Jay Shah’s bubble burst. Always remember, Shahzada prioritized entertainment over people’s lives said congress leader Srivatsa.

News English Title: Congress leader Srivatsa slams Jay Shah after IPL suspension after few cricketers get infected by corona news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPL2021(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x