16 April 2025 5:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त शेअरने 2107 टक्के परतावा दिला, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JPPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर खरेदी करावा, 53 टक्के परतावा मिळेल, ICICI सिक्युरिटीजने दिले संकेत - NSE: VEDL
x

देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन | नेहरूंनी केला होता गौरव

First Hindkesari, winner Shripati khanchanale, passes away

कोल्हापूर, १४ डिसेंबर: एकेकाळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गौरविलेले आणि थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर चमलेले देशातील पहिले हिंदकेसरी श्रीपती शंकर खंचनाळे यांचे सोमवारी सकाळी साडे आठ वाजता वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. अनेक दिग्ग्जांना आस्मान दाखवणाऱ्या या मल्लाच्या निधनामुळे कोल्हापूरची लाल माती देखील अश्रूनी न्हावून निघाली आहे.

श्रीपती खंचनाळे हे अत्यंत गरीब कुटुंबातून आले होते.त्यांचे आई वडील एकसंबा या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गावचे रहिवासी होते. लहानपनापासूनच त्यांना कुस्ती आणि शारीरीक कसरतींची आवड होती. त्यांनी बालपणापासूच तालमीत शड्डू ठोकायला सुरवात केली. 1959 मध्ये पंजाब केसरी बनता सिंह याच्यासोबत झालेली त्यांची कुस्ती प्रचंड गाजली. त्यांनी बनता सिंह याला डाव दाखवत हिंदकेसरीची गदा आपल्या नावावर केली आणि कोल्हापूरचे नाव देशभर झळकले.

१९५८, १९६२ आणि १९६५ साली झालेल्या ऑल इंडिया चॅम्पिअनशीप स्पर्धेची विजेतेपदही खंचनाळे यांनी पटकावली होती. श्रीपती खंचनाळे यांच्यावर उपचार सुरु असताना कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील यांनी क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्याकडे पाठपुरावा करत त्यांच्या उपचारासाठी सरकारकडून ५ लाखांची मदत मिळवून दिली होती.

 

News English Summary: The country’s first Hindkesari Shripati Shankar Khanchanale, once hailed by the Prime Minister of India Pandit Jawaharlal Nehru and rose to international prominence, passed away at 8.30 am on Monday at the age of 86. The death of this wrestler, who showed the sky to many veterans, has also brought tears to the red soil of Kolhapur.

News English Title: First Hindkesari winner Shripati khanchanale passes away news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sports(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या