14 January 2025 6:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई : अजित वाडेकर यांच्या नैतृत्वाखाली भारताने पहिल्यांदाच परदेशात कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला होता. काल त्याच महान क्रिकेटपटूचे वयाच्या ७७ व्या वर्षी मुंबई येथे निधन झाले आहे. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट जगतात शोककळा पसरली आहे. मागील काही काळापासून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईच्या जसलोक इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

त्यांचा भारतीय क्रिकेट जगतातील प्रवास हा १९५८ साली सुरु झाला होता आणि त्यावेळी त्यांनी मुंबईच्या संघातर्फे प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. दरम्यान १९६६ ते १९७४ या काळात त्यांनी भारतीय क्रिकेट टीमचे प्रतिनिधीत्व केले होते. टीमच्या सामन्यांमध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरायचे तर स्लीपमधील उत्तम क्षेत्ररक्षक म्हणूनही अशी त्यांची मुख्य ओळख होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना तत्कालीन सर्वोत्तम वेस्ट इंडिजविरुद्ध खेळायची पहिल्यांदा संधी मिळाली होती. त्यांच्या क्रिकेटमधील योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना १९६७ साली अर्जून तर १९७२ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x