22 January 2025 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

सौरव गांगुली भाजपच्या वाटेवर ? | प. बंगालच्या मैदानात उतरण्याची चर्चा

Former Indian Cricketer Sourav Ganguly, May Join BJP

प. बंगाल, २५ ऑगस्ट : पश्‍चिम बंगालमध्ये कोणत्याही परिस्थितीत कमळ फुलवायचे यासाठी भाजपची मंडळी आतापासूनच कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये खरा सामना सुरू आहे. पश्‍चिम बंगालमध्ये भाजपला यश मिळवून देण्याची जबाबदारी शहा यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे.

ममता बॅनर्जी यांना विरोध करणारा सर्वमान्य चेहरा आज तरी या राज्यात भाजपकडे नाही. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार त्यामुळे भाजपकडून जाहीर करण्यात येत नाही. मात्र भाजपने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियात सुरू आहे. गांगुली हा भाजपमध्ये थेट प्रवेश करणार असल्याचे समजते.. बंगाल न्यू टाऊनमध्ये शाळेसाठी ममता बॅनर्जी यांच्या सरकारने दिलेली दोन एकर जमीन गांगुली याने परत केली आहे. त्याने हा निर्णय अचानक का घेतला ? हा ही प्रश्‍न आहे.

2021 मध्ये पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी गांगुलीला मैदानात उतरविण्याची भाजपची तयारी सुरू असल्याची चर्चा माध्यमातून सुरू असली तरी स्वत: गांगुलीने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्यांने शाळेसाठी सरकारने दिलेली जमीन परत केली आहे. गांगुलीच्या या निर्णयामुळे तो राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याची जोरदार सुरू झाली आहे. गांगुली याने क्रिकेट मैदान गाजविले आहे. एक आक्रमक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असे.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांने क्रिेकेट सोडले नव्हते. तसेच सामाजिक कार्यातही तो सक्रिय होता. पश्‍चिम बंगालमध्ये तो शाळा सुरू करणार होता त्यासाठी ममता बॅनर्जी सरकारने त्याला जमीनही दिली होती. मात्र आता ती जमीन त्यांने परत केली आहे. जर गांगुली राजकारणाच्या मैदानात उतरला पश्‍चिम बंगालचे राजकारणही ढवळून निघू शकते.गांगुली कमळ हाती घेणार असल्याचे वृत्त एबीपी माझा, टीव्ही 9सह इतर वृत्त वाहिन्यांनी दिले आहे.

 

News English Summary: The rumors regarding former India skipper and current BCCI president Sourav Ganguly joining BJP is going to be fuelled further after the legendary cricketer reportedly returned a piece of land that was given to him to build a school in Kolkata’s rapidly developing eastern metropolis, New Town.

News English Title: Former Indian Cricketer Sourav Ganguly path BJP discussion landing West Bengal Election News Latest Updates.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x