22 December 2024 7:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

जय शहांकडून मला धमकी | क्रिकेटपटू हर्षल गिब्जचा गंभीर आरोप | खेळात राजकीय अजेंड्याचाही आरोप

Jay Shah

नवी दिल्ली, ३१ जुलै | बीसीसीआयचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा मुलगा जय शहा यांच्यावर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्षल गिब्जने गंभीर आरोप केले आहेत. काश्मीर प्रिमीअर लिगमध्ये मी सहभाग घेऊ नये म्हणून बीसीसीआय आपल्यावर दबाव टाकत असल्याचं गिब्जने म्हटलंय.

मी काश्मीर प्रिमीअर लिगमध्ये सहभागी झालो तर भविष्यात भारतात क्रिकेटशी संबंधित एकाही कार्यक्रमात मला येऊ दिलं जाणार नाही अशी धमकी मिळाल्याचं जय शहा यांनी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा प्रमुख ग्रॅम स्मिथच्या माध्यमातून दिल्याचं गिब्जने सांगितलं. यासंदर्भात गिब्जने ट्विटवरुन आपली प्रतिक्रीया दिली आहे.

हर्षल गिब्जआधी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर रशिद लतिफनेही बीसीसीआयवर अशाच पद्धतीचे आरोप केले होते. ४ ऑगस्टपासून काश्मीर प्रिमीअर लिग स्पर्धेला सुरुवात होणार असून १७ ऑगस्टला या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. परंतू या स्पर्धेला बीसीसीआयची मान्यता नाही. पाकव्याप्त काश्मीर आणि काश्मीरमधील प्रत्येकी ३ अशा सहा संघांसोबत ही लीग खेळवली जाते. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Former South African Cricketer Herschelle Gibbs accused BCCI secretary Jay Shah for threatening over KPL involvement news updates.

हॅशटॅग्स

#BCCI Cricket(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x