5 November 2024 4:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

फ्रान्स फिफा वर्ल्डकप २०१८चा विश्वविजेता

रशिया : फिफा वर्ल्डकप २०१८ च्या अंतिम सामन्यात पूर्वार्धातच फ्रान्स आणि क्रोएशियाकडून तुंबळ अॅक्शन पाहायला मिळाली. सामान्यांच्या १८व्या मिनिटाला फ्रान्सच्या टीमला मिळालेल्या फ्री-किकचा बचाव करताना क्रोएशियाच्या मॅन्झुकिचने आत्मघातकी ओन गोल केला आणि फ्रान्सला एका गोलाने आघाडी मिळाली.

परंतु आक्रमक क्रोएशियाच्या पेरिसिचने निव्वळ २८व्या मिनिटाला गोल डागत संघाला बरोबरीत आणलं. मग ३८व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी किकची संधी मिळताच ग्रीझमनने थेट गोल केला आणि फ्रान्स’ला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. अखेर मध्यंतरापर्यंत फ्रान्सने २-१ अशी आघाडी कायम राखली होती. परंतु पुन्हा सामना सुरु होताच फ्रान्स’च्या अनुभवी पोगबाने गोल डागत फ्रान्सला ३-१ भक्कम आघाडीत ठेवले.

त्यानंतर लगेचच ६५व्या मिनिटाला एमबापेने गोल डागत फ्रान्सला ४-२ या भक्कम आघाडीवर ठेवले. त्यानंतर लगेचच क्रोएशियाच्या मॅन्झुकिच याने ६९व्या मिनिटाला गोल डागत क्रोएशियाला थोडा दिलासा दिला. त्यानंतर मात्र फ्रान्सने सामना संपेपर्यंत क्रोएशियाला डोक वर करण्याची संधी दिली नाही. शेवटी रेफरीची शिट्टी वाजली आणि फ्रान्स ठरला फिफा फुटबॉल २०१८चा विश्वविजेता.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x