18 January 2025 12:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motilal Oswal Mutual Fund | नोकरदारांची होतेय मजबूत कमाई, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स नोट करा 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात किती वाढ होणार? संपूर्ण आकडेवारी पहा Railway Ticket Booking | 90% प्रवाशांना माहित नाही, चार्ट बनवल्यानंतरही मिळेल कन्फर्म तिकीट, तात्काळ तिकिटापेक्षाही पडेल तिकीट Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नी किंवा मुलीच्या नावावर 2 लाख रुपये FD करा, मिळेल 32,000 रुपयांचे गॅरंटीड व्याज Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग Home Loan EMI | 90% कर्जदारांना माहित नाही, गृहकर्जाचा EMI थकवल्यास बँक अशी टप्प्याटप्याने कारवाई करते, लक्षात ठेवा ITR Filing | या लोकांना पैसे कमावून सुद्धा टॅक्स भरावा लागत नाही, इन्कम टॅक्सही कृपा करतो, फायदा जाणून घ्या
x

ICC क्रिकेट वर्ल्ड कप २०१९: ऑस्ट्रेलियापुढे ३५३ धावांचे मोठं आव्हान

Indian Cricket Team, Australian Cricket Team, ICC Cricket World Cup 2019

ओव्हल: आयसीसी वर्ल्ड कप २०१९ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, नाणेफेकीचा कौल बाजूनं लागणं, रोहित शर्माला जीवदान मिळणं, शिखर धवनला झालेली दुखापत गंभीर नसणं, हार्दिक पांड्याची झेल सुटणं. आज सर्वकाही भारताच्या बाजूनेच असल्यासारखं वातावरण होतं. भारत आणि कांगारू हा सामना म्हटलं की त्यात टशन, डिवचणं आलंच, परंतु आज असे काहीच घडलं नाही. फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीनं फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी ऑसी गोलंदाजांची धुलाई करताना भारतासाठी मजबूत पाया रचला.

त्यानंतर कर्णधार कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार खेळ करत भारतीय संघाला ५ बाद ३५२ धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताची ही वर्ल्ड कप स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी भारतने १९८७ साली दिल्लीत ६ बाद २८९ धावा केल्या होत्या. तसेच वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोणत्याही संघानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x