22 January 2025 9:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

IND vs AUS | भारतीय गोलंदाजांची धुलाई | भारताला विजयासाठी हव्यात ३७५ धावा

India Vs Australia, First One Day, Cricket Match, Aaron Finch

सिडनी, २७ नोव्हेंबर : यजमान ऑस्ट्रेलियाने पाहूण्या भारतीय संघाचे धमाकेदार स्वागत केले आहे. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात (India Vs Australia First One Day Cricket Match) ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ६ बाद ३७५ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार एरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शानदार शतकी खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by cricket.com.au (@cricketcomau)

कर्णधार फिंचने नाणेफेक (Australian Cricket Team Captain Aaron Finch) जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रदीर्घ काळानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी मैदानावर उतरत असलेल्या भारतीय गोलंदाजांची तयारी या सामन्यातून उघड झाली. सुरुवातीला बुमराह, शमी यांचा नेटाने सामना केल्यानंतर फिंच आणि वॉर्नर (Aaron Finch and Warner) या जोडगोळीने मैदानावर स्थिरावत धावांचा वेग वाढवला. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. अखेरीस मोहम्मद शमीने वॉर्नरला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाची जोडी फोडली. वॉर्नरने ६९ धावा केल्या. वॉर्नर माघारी परतल्यानंतर स्टिव्ह स्मिथने फिंचला उत्तम साथ देत भारताला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.

अपरकट मारण्याच्या प्रयत्नात फिंच यष्टिरक्षक लोकेश राहुलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. फिंचनं १२४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारासह ११४ धावा केल्या. मार्कस स्टॉयनिस ( ०) पहिल्याच चेंडूवर चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. स्मिथ व फिंच यांनी ३१-४० षटकांत ९५ धावा चोपल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १०८ धावा जोडल्या.

 

News English Summary: Hosts Australia have given a rousing welcome to the visiting Indian team. In the first match of the ODI series against India (India Vs Australia First One Day Cricket Match), Australia batted first and scored 375 runs for the loss of six wickets. Australia captain Aaron Finch and Steve Smith scored brilliant centuries. David Warner scored a half-century.

News English Title: India Vs Australia First One Day Cricket Match India got target of 375 runs news updates.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x