17 January 2025 12:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE BEL Share Price | डिफेन्स कंपनी BEL शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: BEL RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL Bank Clerk Recruitment | तरुणांसाठी सुवर्ण संधी, सरकारी बँकेत PO आणि क्लार्क पदांसाठी भरती, मोठ्या पगाराची संधी सोडू नका Tata Punch on Road Price | 1 लाखांच्या डाऊन पेमेंटवर 'टाटा पंच' तुमची, महिन्याला भरावी लागणारी EMI ची किंमत पहा Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा PPF Investment Formula | PPF मध्ये फक्त पैसे गुंतवू नका, या फॉर्म्युल्याने PPF बचत करा, मिळेल करोडमध्ये परतावा
x

भारतीय बॉक्सर मेरी कोम जागतिक क्रमवारीत अव्वल

नवी दिल्ली: वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत प्रसिद्ध भारतीय महिला बॉक्सर मेरी कोम हिने ४८ किलो वजनी गटात विजेतेपद प्राप्त केले होते. या विजेतेपदानंतर वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत ६ विजेतेपद पटकावण्याचा विक्रम तिच्या नावावर झाला होता. त्यात आता पुन्हा भारतीय क्रीडा जगातला अभिमानास्पद अशी बातमी मिळाली आहे. कारण, मेरी कोम हिने वर्ल्ड चॅम्पियन रँकिंग अर्थात “AIBA’ मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.

तिच्या कामगिरीत सातत्य राहिल्याने हे शक्य झाल्याचे क्रीडा समीक्षक सांगत आहेत. विशेष म्हणजे मेरीसाठी २०१८ हे वर्ष खूपच चांगले ठरले होते. कारण राष्ट्रकुल स्पर्धा आणि पोलंडमधील इंटरनॅशनल बॉक्सिंग स्पर्धेत या अत्यंत महत्वाच्या अशा दोन्ही स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्याच बहारदार कर्तृत्वाच्या जीवावर तिला नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या इंटरनॅशनल बॉक्सिंग क्रमवारीत ७०० गुणांसह ४८ किलो वजनी गटातील अव्वल प्राप्त झाले आहे. दरम्यान, २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी मेरी कोम हिला ५१ किलो वजनी गटातून सामना खेळावा लागणार आहे. कारण ४८ किलो वजनी गट अद्याप २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे आवाहन सुद्धा खडतर असणार आहे यात शंका नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x