18 January 2025 8:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

UAE IPL 2020 खेळवण्यासाठी केंद्र सरकारकडून मान्यता – ब्रिजेश पटेल

Indian Government Approval, IPL 2020 Tournament, UAE, Chairman Brijesh Patel

नवी दिल्ली, १० ऑगस्ट : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) ) इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल 2020) संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयपीएल यूएईत खेळवण्यासाठी सरकारकडून मान्यता मिळाल्याची माहिती गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. त्यामुळे १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत यूएईत आयपीएल खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीसीसीआयच्या माहितीनंतर 8 फ्रँचायझींनी खेळाडूंना क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पटेल यांनी सांगितले की,”आम्हाला लेखी परवानगी मिळाली आहे.

दरम्यान, आयपीएलच्या 13 व्या सीजनमधून विवो कंपनीला हटवल्यानंतर आयपीएल लीगसाठी नवीन प्रायोजकांसाठी जागा मोकळी झाली आहे. त्यामुळे योगगुरू बाबा रामदेव यांची आयुर्वेद कंपनी पतंजली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १३ व्या सीजनच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी बोली लावण्याची शक्यता आहे. याबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पतंजलीचे प्रवक्ते एसके तिजारावाला यांनी पीटीआयला सांगितले की, ‘आम्ही यावर विचार करीत आहोत. हे स्थानिकांसाठी आणि भारतीय ब्रँडला जागतिक करण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे. आम्ही यात लक्ष घालतोय. पतंजलीने देखील यावर अजून अंतिम निर्णय घेण्याचे बाकी असल्याचेही तिजारावाला म्हणाले आहेत.

 

News English Summary: The Board of Control for Cricket in India (BCCI) has cleared the way for the Indian Premier League (IPL 2020) to be played in the United Arab Emirates. The IPL has been approved by the government to play in the UAE, said Brijesh Patel, chairman of the governing council.

News English Title: Indian Government Gives Formal Approval To Host IPL 2020 Tournament In UAE Says Chairman Brijesh Patel News Latest Updates.

हॅशटॅग्स

#IPL2020(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x