28 January 2025 8:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

हे फक्त नावच बदलू शकतात, उद्या भारताचं नाव USA करतील | ऑलिम्पिक विजेत्याकडून मोदींची खिल्ली

boxer Vijender Singh

नवी दिल्ली, ०७ ऑगस्ट | राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यात आलं असून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत ही माहिती दिली होती. मेजर ध्यानचंद यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतानाचा फोटो ट्विट करत मोदींनी ही माहिती दिली होती. मोदींनी यासंदर्भातील ट्विट केल्यानंतर गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमची नावं बदलून प्रसिद्ध खेळाडूंची नावं द्याची अशी मागणी जोर धरू लागताच भाजप नेते शांत झाले.

मात्र आता देशातील ऑलिम्पिक विजेत्याकडून देखील पंतप्रधान मोदींची खिल्ली उडविण्यास सुरुवात झाली आहे. ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगने उडी घेतली आहे. विजेंदर सिंगने नाव न घेता मोदी सरकारला टोला लगावला. “भाई, हे फक्त नाव बदलू शकतात, काही दिवसात भारताचे नाव देखील बदलून यूएसए करतील”, असा टोला विजेंदर सिंगने ट्विट करत लगावला आहे. विजेंदर सिंग याचे ट्विट खूप चर्चेत असतात. यापूर्वी देखील त्याने ऑलिम्पिक कव्हर करण्याबाबत भारतीय प्रसारमाध्यमांवर जोरदार निशाणा साधला होता.

बॉक्सर विजेंदर सिंगने २००४ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये बॉक्सर स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. त्यानंतर तो प्रकाशझोतात आला. त्यावेळी हरियाणामध्ये काँग्रेसचे सरकार होते आणि विजेंदरला मोठ्या पदावर नोकरीसह मोठा रोख रकमेसह पुरस्कार मिळाला. दिल्लीच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत विजेंदर सिंह यांनीही काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: International boxer Vijender Singh criticized PM Narendra Modi over Rajiv Gandhi Khel Ratna Award politics news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x