18 November 2024 10:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 80 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
x

#IPL २०१९: मुंबई इंडियन्सची चेन्नईवर मात; जेतेपदावर चौथ्यांदा नाव कोरले

Mumbai Indian, Chennai Super 11, IPL 2019

हैदराबाद : भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलचे चौथ्यांदा जेतेपद पटकावले. मुंबईने चेन्नईपुढे विजयासाठी एकूण १५० धावांचे आव्हान ठेवले होते. वॉटसनचा अपवाद वगळता एकाही चेन्नईच्या फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. त्यामुळे मुंबईला चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावता आले. मुंबईने अखेरच्या चेंडूवर फक्त एका धावेने रोमहर्षक विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले.

मुंबईच्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची चांगली सुरुवात झाली. पण कालांतराने त्यांनी ठराविक फरकाने फलंदाज गमावले. मात्र यावेळी अपवाद ठरला तो शेन वॉटसन. आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी न करू शकलेल्या वॉटसनने धडाकेबाज फटकेबाजी करत चेन्नईचे आव्हान जीवंत ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना वॉटसनने अर्धशतक झळकावले. ही खेळी साकारताना वॉटसनला तब्बल तीनवेळा जीवदान मिळाले.

हॅशटॅग्स

#IPL2019(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x