IPL २०१९: मुंबईचा चेन्नईवर दणदणीत विजय

मुंबई : मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानात जेसन बेहरनडॉर्फ, लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्याने केलेल्या माऱ्याच्या जोरावर चेन्नईचा विजयरथ रोखला. यासह मुंबईने आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत शंभराव्या विजयाची नोंद केली आहे. मुंबई इंडियन्सने चेन्नईचा तब्बल ३७ धावा अशा मोठ्या फरकाने पराभव केला.
दोन माजी विजेत्या संघांमध्ये सुरू असलेल्या लढतीत यजमान मुंबईने सूर्यकुमार यादव, पांड्या बंधू यांनी केलेल्या सुरेख फटकेबाजीच्या जोरावर महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नईसमोर १७१ धावांचे विजयी लक्ष्य ठेवले. १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला वीस षटकांच्या अखेरीस आठ बाद १३३ धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईकडून मराठमोळ्या केदार जाधवने ५८ धावांची अर्धशतकी खेळी केली, परंतु त्याला इतर खेळाडूंची हवीतशी साथ मिळाली नाही. केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनीने अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मुंबईकडून लसिथ मलिंगा आणि हार्दिक पांड्याने ३-३ बळी घेतले. त्यांना बेहरनडॉर्फने २ बळी घेत चांगली साथ दिली.
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजी दिली. सुरुवातीला त्याचा हा निर्णय चेन्नईसाठी फायदेशीरच ठरला. मुंबईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर डीकॉकला तिसर्याच षटकांत चहरने अवघ्या ४ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर कर्णधार शर्मा फार काळ टिकला नाही. जडेजाने त्याला धोनीमार्फत १३ धावांवर झेलबाद करून मुंबईला दुसरा मोठा धक्का दिला. यंदा प्रथमच मुंबई संघातर्फे खेळणार्या युवराजसिंगने पुन्हा एकदा निराशा केली. ताहीरने त्याला रायडूमार्फत ४ धावांवर झेलबाद केले. त्यावेळी मुंबईची अवस्था ३ बाद ५० धावा अशी बिकट झाली होती. मग सूर्यकुमार यादव अणि कृणाल पांड्या यांनी ४ थ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी करून मुंबईचा डाव सावरला. या दोघांनी संयमी फलंदाजी करून मुंबईला तारले.
अखेर ही जमलेली जोडी मोहित शर्माने फोडली. त्याने पांड्याला जडेजामार्फत ४२ धावांवर झेलबाद केले. त्याने ३२ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकार मारला. पांड्या पाठोपाठ सूर्यकुमार यादवदेखील लगेचच बाद झाला. त्याला ब्राव्होने जडेजामार्फत ५९ धावांवर झेलबाद केले. ४३ चेंडू खेळताना यादवने ८ चौकार आणि १ षटकार मारले. नंतर आलेल्या हार्दिक पंड्याने चेन्नई गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढविला. त्याने अवघ्या ८ चेंडूंत ३ षटकर आणि १ चौकार मारून नाबाद २५ धावा ठोकल्या. तर पोलार्डने ७ चेंडूंत २ चौकार मारून नाबाद १७ धावा केल्या. या दोघांनी ब्राव्होच्या शेवटच्या षटकांत तब्बल २९ धावा फटकावल्या. त्यामध्ये ३ षटकार आणि १ चौकाराचा समावेश आहे. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद ४५ धावांची झटपट भागीदारी केली. प्रथम फलंदाजी करणार्या मुंबईने २० षटकांत ५ बाद १७० धावांची चांगली मजल मारली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल