15 January 2025 2:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

IPL 2023 Mumbai Indians | मुंबई इंडियन्सला एका खेळाडूमुळे वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागणार? आकाश चोप्राने सांगितलं नाव

IPL 2023 Mumbai Indians Team

IPL 2023 Mumbai Indians | आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सचे पदार्पण पुन्हा एकदा लाजिरवाणे ठरले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने आपले पहिले दोन सामने गमावले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएलमधील दोन सर्वोत्तम संघांविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळवता आला नाही. दोन्ही सामन्यात संघाच्या फलंदाजांनी कमालीची निराशाजनक कामगिरी केली आहे. सूर्यकुमारच्या बॅटने धावा केल्या नाहीत तर मुंबई इंडियन्स या मोसमात फार काळ टिकू शकणार नाही, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने व्यक्त केले आहे.

Mumbai-Indians-Team-Player-List-IPL-2023

अत्यंत खराब फॉर्ममधून
टी-20 मध्ये जगातील नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध १५ धावांची खेळी केली होती. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याला एकच धावा करता आली. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध च्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तो तीनही सामन्यात शून्य धावांवर बाद झाला होता. चोप्रा म्हणाले की, सूर्यकुमार सध्या खडतर परिस्थितीतून जात आहे आणि मुंबई इंडियन्ससाठी ही थोडी समस्या आहे.

IPL-2023-Mumbai-Indians-Team-Players

आकाश चोप्राने सांगितले
आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, सूर्यकुमार यादव वाईट काळातून जात आहे. ही थोडी अडचण आहे कारण सूर्यकुमारने धावा केल्या नाहीत तर मुंबई इंडियन्स फार पुढे जाऊ शकणार नाही. वानखेडेचा किल्लाही तुटला आहे. चेन्नईसंघाने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत, तर मुंबई मागील हंगामाप्रमाणे पहिल्या विजयाच्या शोधात आहे. मुंबईची फलंदाजी पुन्हा एकदा ढासळताना दिसली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IPL 2023 Mumbai Indians Team check details on 09 April 2023.

हॅशटॅग्स

#IPL 2023 Mumbai Indians Team(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x