22 December 2024 6:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

IPL Auction 2021 | अर्जुन तेंडुलकर २० लाखांच्या बेस प्राईजमध्ये मुंबई इंडियन्स'मध्ये

IPL Auction 2021, Arjun Tendulkar, Mumbai Indians

मुंबई, १९ फेब्रुवारी: IPL Auction 2021 महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन आता इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. गुरुवारी चेन्नईत पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात MIनं अर्जुनला २० लाखांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. अनकॅप खेळाडूंमध्ये अर्जुनचं नाव न आल्यानं सर्व बुचकळ्यात पडले होते, परंतु मुंबई इंडियन्सनं त्याला शॉर्ट लिस्ट करून अखेरच्या फेरीसाठी राखून ठेवले आणि लिलावातील शेवटचं नाव हे अर्जुनचेच होते. मुंबई इंडियन्स या एकमेव संघानं त्याच्यासाठी बोली लावली.

दरम्यान यावेळी अर्जुनला संघात घेण्यासाठी कोणताही संघ उत्सुक असल्याचे दिसत नव्हते. त्यावेळी मुंबईच्याच संघाने अर्जुनला त्याच्या बेस प्राइजलाच आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले. त्यामुळे आता अर्जुन मुंबई इंडियन्सकडून खेळताना कशी कामगिरी करतो, याची उत्सुकता सर्वांना असेल.

अर्जुन तेंडुलकर उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. तर वेळप्रसंगी विस्फोटक फलंदाजी करु शकतो. अर्जुन तेंडूलकर तळाला संघासाठी मोठे फटके मारु शकतो. अर्जुनने नुकत्याच झालेल्या पोलीस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू क्षमतेची चुणूक दाखवून दिली होती. अर्जुनने एकाच षटकात ५ षटकार लगावत ३१ चेंडूत ७७ केल्या. तसेच तीन महत्वाचे बळीही मिळवले.

 

News English Summary: IPL Auction 2021 Arjun Tendulkar’s son Arjun will now play for Mumbai Indians in the 14th edition of the Indian Premier League. In the players’ auction held in Chennai on Thursday, MI admitted Arjun to its squad at a base price of Rs 20 lakh. Arjun’s name was not mentioned among the uncapped players, but the Mumbai Indians shortlisted him and reserved him for the final round and the last name in the auction was Arjun’s. Mumbai Indians were the only team to bid for him.

News English Title: IPL Auction 2021 Arjun Tendulkar son of Sachin Tendulkar will now play for Mumbai Indians news updates.

हॅशटॅग्स

#IPL2021(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x