22 December 2024 6:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

IPL Auction 2021 | अष्टपैलू ख्रिस मॉरिस ठरला सर्वात महाग खेळाडू

IPL auction 2021, Chris Morris, Most expensive player, IPL history

मुंबई, १८ फेब्रुवारी: दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसने (Chris Morris) आयपीएलच्या हंगामात इतिहास रचला आहे. ख्रिस मॉरिसला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली (Chris Morris IPL bid price) लागली आहे. ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) तब्बल 16 कोटी 25 लाख मोजले आहेत. मॉरीसला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि मुंबई इंडियन्सही स्पर्धेत होती. पण अखेर मोठी रक्कम मोजत मॉरीसला राजस्थानने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. मॉरिसची बेस प्राईजही 75 लाख रुपये इतकी होती.

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिस (Chris Morris) आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळत होता. मॉरिसने 13 व्या मोसमात एकूण 9 सामन्यात त्याने 6.63 च्या इकॉनॉमी रेटने 11 विकेट्स घेतल्या होत्या. मॉरिस ऑलराऊंड प्लेअर आहे.

आयपीएल ऑक्शनमधील महागडे खेळाडू ( Highest purchases in #IPLAuction)

  • ख्रिस मॉरिस – १६.२५ कोटी ( राजस्थान रॉयल्स २०२१)
  • युवराज सिंग – १६ कोटी ( दिल्ली कॅपिटल्स २०१५)
  • पॅट कमिन्स १५.५ कोटी ( कोलकाता नाइट रायडर्स, २०२०)
  • बेन स्टोक्स १४.५ कोटी ( रायझिंग पुणे सुपरजायंट्स २०१७)
  • ग्लेन मॅक्सवेल १४.२५ कोटी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २०२१)
  • युवराज सिंग १४ कोटी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २०१४)

 

News English Summary: South Africa’s Chris Morris has made history in the IPL season. Chris Morris has got the biggest bid in the history of IPL (Chris Morris IPL bid price). The Rajasthan Royals have calculated Rs 16.25 crore for Chris Morris. Royal Challengers Bangalore (RCB) and Mumbai Indians were also in contention for Morris. But in the end, Rajasthan has taken Morris in its ranks by counting a large amount. Morris also had a base price of Rs 75 lakh.

News English Title: IPL auction 2021 Chris Morris becomes most expensive player IPL history news updates.

हॅशटॅग्स

#IPL2021(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x