तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता | पण यापुढे सगळं वेगळं असेल | मराठी दिग्दर्शकाची प्रतिक्रिया
मुंबई, ०५ फेब्रुवारी: रिहानाच्या ट्विटनंतर भारतातील वातावरण ढवळून निघालं असून जगभरात शेतकरी आंदोलन चर्चेचा विषय बनला आहे. त्यात २ महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन सुरु असताना देखील भारतातील सेलिब्रेटी शांत असल्याचं पाहायला मिळालं. त्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे आंदोलनात ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू होऊन देखील प्रतिष्ठित व्यक्ती तोंड उघडत नव्हते. मात्र मोदी सरकारवर आंतरराष्ट्रीय स्तरातून टीका होताच बॉलिवूड सहित अनेक क्रिकेटर्स झोपेतून जागे झाल्याचं पाहायला मिळालं. एकानेही शेतकऱ्यांची बाजू न घेता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मोदी सरकारची तळी उचलल्याचे पाहायला मिळले. त्यानंतर देशभरातुन संबंधित क्रिकेटर्सवर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यात सचिन तेंडुलकर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यासाठी जुने संदर्भ देखील दिले जात आहेत.
सचिन तेंडुलकरनं बुधवारी एक ट्विट केलं. त्यात त्यानं अप्रत्यक्षपणे शेतकरी आंदोलनासंदर्भात केंद्र सरकारची बाजू घेतली. त्यानं ट्विट केलं की,”भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगले ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा.” तसेच त्यानं आपल्या ट्विटमध्ये #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या हॅश टॅग्सचाही वापर केला आहे.
सचिनच्या या ट्विटनंतर आनंदी गोपाळ आणि धुरळा यांसारख्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक समीर विध्वंस यांनीही परखड प्रतिक्रिया दिली आहे. सचिनची बॅटिंग बघत लहानाचा मोठा झालो! तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता! पण आता मात्र इथून पुढे सगळं वेगळं असेल, अशी प्रतिक्रिया समीर विध्वंस यांनी ट्विटरद्वारे दिली. “सचिनची बॅटींग बघत लहानाचा मोठा झालो! तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता! आयुष्यात अनेक निराश क्षणी मी त्याच्या इनिंग्ज बघायचो, खूप बरं वाटायचं. त्याच्या अनेक गोष्टी मनाला पटल्या नाहीत पण हे कधी बदललं नव्हतं. पण आता मात्र इथून पुढे सगळं वेगळं असेल. राग येतोचे पण वाईट जास्त वाटतंय!” असं ट्विट समीर विध्वंस यांनी केलं आहे. त्यांनी हे ट्विट करताना कुठेही सचिनला टॅग वगैरे केलेलं नाही, पण आपला राग त्यांनी व्यक्त केला आहे.
सचिनची बॅटींग बघत लहानाचा मोठा झालो! तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता! आयुष्यात अनेक निराश क्षणी मी त्याच्या इनिंग्ज बघायचो, खूप बरं वाटायचं.
त्याच्या अनेक गोष्टी मनाला पटल्या नाहीत पण हे कधी बदललं नव्हतं.
पण आता मात्र इथून पुढे सगळं वेगळं असेल.
राग येतोचे पण वाईट जास्त वाटतय!— Sameer Vidwans (@sameervidwans) February 4, 2021
यासोबतच, शेतकरी आंदोलनाला रोखण्यासाठी अश्रूधूर, लाठ्या, आणि ठोकलेले खिळे तुम्हाला पटतात का? अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी भारत अशाप्रकारे समर्थ आहे का ? असा सवालही त्यांनी अन्य एका ट्विटद्वारे विचारला. “भारताबाहेरच्या लोकांनी ‘आपल्या’ अंतर्गत मामल्यात बोलायची गरज नाही, तुमचं मत. चला ठीक! तुम्हाला सरकारची बाजू पटत्ये. ओके! तरीही ‘आपल्याच’ शेतकऱ्यांना आंदोलनापासून रोखण्यासाठी अश्रूधूर, लाठ्या,बांधलेल्या भिंती आणि ठोकलेले खिळे तुम्हाला पटतात का?! ‘भारत समर्थ आहे’ असा??!! असा सवाल त्यांनी विचारला आहे.
‘भारताबाहेरच्या लोकांनी ‘आपल्या’ अंतर्गत मामल्यात बोलायची गरज नाही’ तूमचं मत.चला ठीक!
तूम्हाला सरकारची बाजू पटत्ये. ओके!
तरीही ‘आपल्याच’ शेतकऱ्यांना आंदोलनापासून रोखण्यासाठी अश्रूधूर, लाठ्या,बांधलेल्या भिंती आणि ठोकलेले खिळे तूम्हाला पटतात का?!
‘भारत समर्थ आहे’
असा??!!— Sameer Vidwans (@sameervidwans) February 4, 2021
News English Summary: After Sachin’s tweet, Sameer Vidhwans, the director of Marathi films like Anandi Gopal and Dhurla, has also reacted strongly. I grew up watching Sachin bat! He was the god of cricket for me! But from now on, everything will be different, said Samir Vidhwans on Twitter. “I grew up watching Sachin bat! He was the god of cricket for me! I used to watch his innings at many depressing moments in my life, I felt very good. Many things did not sit well with me but it never changed. But it feels worse! ” This tweet was made by Sameer Vidhvans. He did not tag Sachin anywhere while tweeting this, but he has expressed his anger.
News English Title: Marathi film director Sameer Vidwans reaction going viral after Sachin Tendulkar tweet on farmer protest news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय