23 April 2025 1:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | शेअर असावा तर असा, तब्बल 1,33,786 टक्के परतावा, संयम पळणारे श्रीमंत झाले - NSE: BEL Bonus Share News | अशी संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: UEL Horoscope Today | 23 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | आयआरबी शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: IRB Reliance Power Share Price | शेअर प्राईस 43 रुपये; रिलायन्स पॉवर शेअर्सबाबत फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Apollo Micro Systems Share Price | तगडा परतावा मिळेल, हा डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार - NSE: APOLLO Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 23 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

आयपीएल २०१९: मुंबई इंडियन्सचा चेन्नईवर दणदणीत विजय

CSK, Mumbai Indian, IPL 2019

चेन्नई : आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत चेन्नई-मुंबई या २ बलाढ्य संघातील लढतीत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने काढलेल्या अर्धशतकाच्या जोरावर आणि गोलंदाजांच्या भेदक माऱ्याने मुंबईने चेन्नईवर ४६ धावांनी सहज विजय मिळवला. धोनीच्या गैरहजेरीत खेळणाऱ्या चेन्नईला केवळ १०९ धावाच करता आल्या. या विजयामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेतील दुसऱ्या स्थानी पोहोचला असून ‘प्ले-ऑफ्स’ फेरीसाठी त्यांची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे.

सलामीवीर शेन वॉटसनने ३ चेंडूत २ चौकार लगावत तडाखेबाज सुरुवात केली होती, पण पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. कर्णधार सुरेश रैना केवळ २ धावा करून झेलबाद झाला आणि चेन्नईला दुसरा धक्का बसला. उंच फटका मारताना तो माघारी परतला. त्यापाठोपाठ अंबाती रायडू शून्यावर त्रिफळाचीत झाला. केदार जाधव खेळपट्टीवर स्थिरावत असताना त्याला कृणालने त्रिफळाचीत केले. केदारने पाच धावा केल्या. नव्या दमाच्या ध्रुव शोरे यांच्याकडून चेन्नईला अपेक्षा होत्या, पण तो मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. तो ५ धावा काढून माघारी परतला.

चेन्नईचे पाच फलंदाज १० षटकांत ६० धावांवर माघारी परतले होते. त्यानंतरही चेन्नईचे धक्का सत्र कायम राहिले. एकाकी झुंज देणारा मुरली विजय १२ व्या षटकात झेलबाद झाला. विजयने ३ चौकार आणि १ षटकार यांच्या साहाय्याने ३८ धावा केल्या. मिचेल सँटनर आणि ब्राव्हो यांच्यात भागीदारी होण्यास सुरुवात होतानाच ब्राव्हो झेलबाद झाला. त्यामुळे चेन्नईच्या अडचणी वाढल्या. ब्राव्हो २० धावांवर माघारी परतला. त्यानंतर कोणीही फलंदाज फार काळ खेळपट्टीवर स्थिरावला नाही.

प्रथम फलंदाजी करणार्‍या मुंबईने २० षटकांत ४ बाद १५५ धावांची मजल मारली. धोनीच्या गैरहजेरीत चेन्नईचे नेतृत्व करणार्‍या सुरेश रैनाने नाणेफेक जिंकून प्रथम मुंबईला फलंदाजी दिली. त्याचा निर्णय चेन्नईच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून मुंबईला मोठी धावसंख्या करू न देता सार्थचे ठरवला. कर्णधार शर्माने ४८ चेंडू खेळताना ६ चौकार आणि ३ षटकार मारून ६७ धावांची खेळी केली. यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील त्याचे हे पहिलेच अर्धशतक होते. त्याला लुईसने ३२ आणि हार्दिक पांड्याने नाबाद २३ धावा काढून चांगली साथ दिली. चेन्नईच्या सॅन्टनरने २ बळी घेतले. ताप असल्यामुळे धोनीने या सामन्यात विश्रांती घेतली. तर सलग ९७ सामने खेळल्यानंतर रवींद्र जडेजाशिवाय चेन्नईचा संघ आज मैदानात प्रथमच उतरला. या सामन्यात पांड्या आणि चहर बंधुंनी जोडी खेळत होती.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या