24 November 2024 10:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

मुंबई मॅरेथॉन २०२० : १७व्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद

Mumbai Marathon 2020

मुंबई: आशियातील सर्वात सर्वात मोठी व मानाचा ‘गोल्ड लेबल’ दर्जा मिळालेल्या मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत नऊ हजारांनी वाढलेली धावपटूंची संख्या नागरिकांमध्ये ‘फिटनेस’चे वाढलेले महत्त्व अधोरेखित करताना दिसत आहे. त्यात कडाक्याच्या थंडीला न जुमानता मुंबईकरांनी मोठ्या संख्येने मुंबई मॅरेथॉनला उपस्थिती लावली आहे. देश-विदेशातील नामांकित धावपटू विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाले असून यंदाही केनिया, इथियोपियाचे धावपटू यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मुंबई मॅरेथॉन टीमने ‘बी बेटर’ या थीमसह, घनकचरा व्यवस्थापनासाठी उचललेले विशेष पाऊल पाहता यंदाची ‘टीएमएम २०२०’ पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. तर वरळी डेअरी येथून अर्धमॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. मुंबई मॅरेथॉनचे यंदाचे हे १७वे वर्ष असून, या प्रतिष्ठेच्या मॅरेथॉनमध्ये सुमारे ५५, ३२२ धावपटूंनी सहभाग निश्चित केला आहे. यामध्ये ९,६६० मुख्य मॅरेथॉन आणि १५ हजार २६० धावपटू अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी होती. त्याचप्रमाणे, खुली १०किमी रन (८,०३२), ड्रीम रन (१९,७०७), वरिष्ठ नागरिक रन (१,०२२), दिव्यांग (१,५९६) व पोलीस कप (४५ संघ) अशा इतर गटांमध्येही सहभागी झाले आहे.

भारतीयांमध्ये सेनादलाच्या श्रीनू बुगाथा आणि ऑलिम्पियन सुधा सिंग यांनी मुंबई मॅरेथॉनद्वारे टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील आपली जागा निश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. अर्धमॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय विक्रमवीर अविनाश साबळे आणि मोनिका आथरे तसेच स्वाती गाढवे विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक होते.

 

Web Title:  Mumbai Marathon 2020 started in early morning.

हॅशटॅग्स

#Sports(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x