महत्वाच्या बातम्या
-
फिल्मी भाजपला पद्म पुरस्कार श्रीदेवी लक्षात, पण पद्म पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर सरांचा विसर
भारताला ‘क्रिकेटचा देव’ देणारे आणि जो भविष्यात भारतरत्न झाला, अशा महान सचिन तेंडुलकरचे गुरु आणि पद्म पुरस्कार विजेते द्रोणाचार्य रमांकात आचरेकर सर यांचे बुधवारी वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. शिवाजी पार्क येथील भागोजी कीर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत मुंबईतील अनेक महान क्रिकेटपटू, जाणकार आणि राजकीय नेते मंडळी उपस्थित होती. भारतरत्न सचिन तेंडुलकरने आपले गुरु आचरेकर सरांच्या पार्थिवाला खांदा दिला. दरम्यान, यावेळी सचिन आणि सरांचे सर्वच शिष्य अत्यंत भावुक झाले होते.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs AUS 4th Test : विराट कोहली माघारी, भारताला तिसरा धक्का
कांगारूंविरुद्ध त्यांच्याच भूमीत ऐतिहासिक जेतेपदासाठी सज्ज असलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे.
6 वर्षांपूर्वी -
क्रिकेटच्या देवाचे गुरु रमाकांत आचरेकर यांचं निधन
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आणि भारताला लाभलेला क्रिकेटचा देव ज्यांच्यामुळे लाभला ते रमाकांत आचरेकर यांचं आज निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. आचरेकर सरांनी भारतरत्न तेंडुलकरसह विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित असे दिग्गज क्रिकेट खेळाडू भारताला दिले. त्यांच्या सर्व शिष्याचें भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान आहे हे विसरता येणार नाही. दरम्यान, त्यांच्या निधनाने क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मेलबर्न: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, भारताने तिसरी कसोटी जिंकली
बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाने अखेरच्या दिवशी विजय प्राप्त केला. भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियावर तब्बल १३७ धावांनी विजय प्राप्त केला आहे. दरम्यान, या सामन्यामुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर २-१ अशी आघाडी घेतली आहे आणि सरत्या वर्षाचा अंत गोड केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs AUS ऑस्ट्रेलिया १५१ धावांत गारद; भारताकडे २९२ धावांची आघाडी
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस ऑस्ट्रेलियासाठी अत्यंत वाईट ठरला आहे. भारतीय टीमने दिलेल्या ४४४ धावांचा पाठलाग करताना कांगारूंची खेळी अवघ्या १५१ मध्ये संपुष्टात आली आहे. बुमराहच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १५१ धावांमध्ये पूर्णपणे संपुष्टात आला आहे. त्याने तब्बल ६ विकेट्स तंबूत धाडल्या.
6 वर्षांपूर्वी -
IND Vs AUS 3rd Test: भारताने ४४३ धावांवर डाव घोषित केला
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा (१०६) आणि कर्णधार विराट कोहली (८२) यांनी उभ्या केलेल्या धावसंख्येवर आणि इतर फलंदाजांनी उभारलेल्या धावांवर भारत चांगल्या स्थितीत पोहोचला आहे.
6 वर्षांपूर्वी -
AUS Vs India तिसरी कसोटी; पहिल्या दिवसअखेर भारत २ बाद २१५
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय क्रिकेट टीमने पहिल्या दिवसाच्या अखेर सामन्यावर चांगले नियंत्रण राखले आहे. दरम्यान, आजच्या दिवसभराच्या नवोदित मयंक अग्रवालने ७६ तर अनुभवी चेतेश्वर पुजाराने ६८ नाबाद अशा धावा घेऊन भारताला पहिल्या दिवसअखेर २ बाद २१५ धावांपर्यंत मजल मारली आहे. लोकेश राहुल आणि मुरली विजय यांना संघाबाहेर करून मयंक-विहारी हा नवा सलामी जोडीचा प्रयोग भारतीय टीमने केला होता. त्यामुळे हा प्रयोग काहीसा पोषक ठरला आहे असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
बाला रफिक शेख ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी
बाला रफिक शेखने गतविजेत्या अभिजीत कटकेवरला चितपट करत यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचा बहुमान पटकावला आहे. बुलढाण्याच्या बाला रफिक शेखने अभिजितवर ११-३ अशी मात केली. या सामन्यानंतर एका मातीतल्या पैलवानाने मॅटच्या पैलवानाला चितपट केल्याची चर्चा रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पी. व्ही. सिंधूला वर्ल्ड टूर फायनल्सचं विजेतेपद
पी. व्ही. सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहारावर तडफदार विजयश्री प्राप्त करत वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेचं जेतेपद नावावर केलं आहे. सिंधूने ओकुहारावर २१-१९,२१-१७ अशी मात करत या जागतिक किताबावर स्वतःच आणि देशाचं नाव कोरलं आहे. महत्वाचं म्हणजे वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेचं तिने हे पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं आहे आणि त्यामुळे बॅडमिंटन जगतात तीच कौतुक करण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
विराट कोहली व अजिंक्य रहाणेची संयमी खेळी, भारत सुस्थितीत
भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान विराट कोहलीच्या संयमी खेळीने आणि त्याला चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची लाभलेली साथ.यामुळे आज दुसऱ्यादिवशी भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत चिकाटीने पुन्हा कमबॅक केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
कांगारुंची झुंज अपयशी, विराटसेनेचा यजमानांवर विजय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय टीमने कांगारूंवर ३१ धावांनी विजय मिळवला आहे. कांगारुंपुढे ३२३ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. भारतीय गोलंदाजांनी कांगारूंचा दुसरा डाव २९१ धावांतच गुंडाळला. ऑलराऊंडर पॅट कमिन्स आणि कर्णधार टीम पेन यांनी जोमाने केली करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांची झुंज अपयशी ठरली. भारताच्या तेज गोलंदाजीपुढे कांगारुंचे प्रयत्न अपुरे पडले. अखेर भारताने चार सामन्यांच्या मालिकेत यजमानांवर १-० अशी आघाडी घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
चेतेश्वर पुजाराच्या १२३ धावांच्या खेळीने भारताचा डाव सावरला
येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट मॅच दरम्यान भारतीय क्रिकेट संघ पहिल्या डावात मोठ्या अडचणीत सापडला होता. दरम्यान, होमपीचवर ऑस्ट्रेलियन टीम भारतीय खेळाडूंना सहज मात देईल असे वाटत होते. परंतु, मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजाराने वैयक्तिक शतकी खेळी करत पहिल्यांदा भागीदारी करत भारताला सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला. अखेर पुजाराच्या महत्त्वपूर्ण फलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर ९ बाद २५० धावा केल्या आणि टीमचा जीव भांड्यात पडला.
6 वर्षांपूर्वी -
जागतिक बॉक्सिंग स्पर्धा: मेरीकोमची अंतिम फेरीत धडक
जागतिक ख्यातीची भारतीय बॉक्सिंग सुपरस्टार एम. सी. मेरी कोम हीने तिच्या कारकिर्दीतील ६व्या विश्वविजेतेपदासाठी नवी दिल्ली येथील विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. त्याआधी तिने उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यांग हिला ५-० ने सहज पराभूत केले आणि अंतिम फेरी गाठली आहे.
6 वर्षांपूर्वी -
महिला ट्वेण्टी-२० वर्ल्ड कप; भारतीय महिला टीमचे आव्हान संपुष्टात
महिलांच्या ट्वेण्टी-२० वर्ल्ड कपमधून भारतीय संघाचे आव्हान अखेर संपुष्टात आलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडच्या महिला टीमकडून पराभव झाला आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारून इंग्लंड टीम समोर ११३ धावांचं लक्ष ठेवलं होतं. परंतु, इंग्लंडच्या टीमने भारतावर ८ विकेट्सने दणदणीत विजय प्राप्त केला आहे. आता अंतिम सामान्यतर इंग्लंडची गाठ ऑस्ट्रेलिया टीमसोबत पडणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
विराट कोहली १०,००० धावांचा पल्ला गाठणाऱ्या विक्रमवीरांच्या यादीत
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताय टीमचा कर्णधार विराट कोहलीने १०,००० धावांचा पल्ला गाठला आहे. १०,००० धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये त्याने आज दिमाखात प्रवेश केला आहे. विराटने १०,००० धावांचा टप्पा केवळ २०५ डावांमध्ये ओलांडून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
#Metoo ची छाया क्रिकेटविश्वावर, BCCI सीईओंवर लैंगिक शोषणाचे आरोप
#Metoo ची छाया क्रिकेटविश्वावर पडली असून बीसीसीआयचे सीईओ जोहरी यांच्यावर आता गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बीसीसीआयचे सीईओ जोहरी यांच्यावर एका महिला लेखिकेने लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या प्रशासकीय समितीने जोहरी यांच्याकडे संबंधित महिलेले केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण मागितलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
बिहारी खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांचे पृथ्वी शॉ आणि मनसेच्या नावाने स्टंट?
पृथ्वी शॉ’च्या क्रिकेटमधील जडणघडणीत महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाच्या मदतीचा मोलाचा वाटा आहे. अगदी प्रथम श्रेणी क्रिकेट पासून ते अंडर- १५ आणि अंडर-१९ क्रिकेट पर्यंत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा पृथ्वी शॉ नेहमीच एका मुंबईकरांसारखा महाराष्ट्रात एकजीव झाला होता तसेच तो आणि त्याच संपूर्ण कुटुंब उत्तम मराठी सुद्धा बोलतात हे सर्वश्रुत आहे. असं सर्व असलं तरी महाराष्ट्राने खेळाकडे आणि खेळाडूंकडे कधीच संकुचित दृष्टिकोनातून पाहिले नाही. अगदी आज त्याची ख्याती जगभरात पोहोचली तरी सर्वांनी पृथी शॉ या नम्र आणि गुणी खेळाडूंकडे केवळ भारतीय क्रिकेटचा उगवता तारा असच पाहिलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
मराठमोळ्या साईश्वरने जिंकली २१ किमी अंतराची चंदीगड नॅशनल हाफ मॅरेथॉन
मूळचा सोलापूरचा असणारा आणि जुनियर मिल्खासिंग म्हणून ओळख असणाऱ्या साईश्वर गुंटूकने चण्डीगढ़ नॅशनल हाफ मॅरेथॉन ही तब्बल २१ किलोमीटरची स्पर्धा २ तास २१ मिनिटात पूर्ण करून १८ वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दरम्यान साईश्वरला ट्राफी, मेडल सोबतच सर्वात लहान खेळाडू म्हणून ‘शेर-ए-पंजाब’ या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
6 वर्षांपूर्वी -
युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या जेरेमीने पटकावले पहिले सुवर्ण
भारताचा युवा वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालरीनुंगाने यंदाच्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले सुवर्णपदक पटकावण्याचा मान मिळवला आहे. ६४ किलो वजनी गटात त्याने एकूण २७४ किलो वजन उचलून सुवर्णपदक नावावर केले.
6 वर्षांपूर्वी -
पृथ्वी शॉचा विक्रम, कसोटी सामन्यात पदार्पणातच शतक
राजकोट येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामन्यात पदार्पणातच पृथ्वी शॉने स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे. कारकिर्दीत स्थानिक क्रिकेटमध्येच तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने शतकी खेळी करत भारताला सुस्थितीत उभं केलं आहे. पृथ्वीने ९९ चेंडूत १०१ धावा पूर्ण केल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम