महत्वाच्या बातम्या
-
चक दे इंडिया | भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास | ऑलिम्पिक उपांत्य फेरीत धडक
भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. हा संघ प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारताने उपांत्यपूर्व फेरीत तीन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव केला. भारतीय संघाने 1980 मध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता. मात्र, तेव्हा उपांत्य फेरीचे स्वरूप नव्हते. ग्रुप स्टेजनंतर, सर्वाधिक गुण असलेले 2 संघ थेट अंतिम फेरीत खेळले होते. भारतीय संघ पूलमध्ये चौथ्या स्थानावर राहिला होता.
3 वर्षांपूर्वी -
जय शहांकडून मला धमकी | क्रिकेटपटू हर्षल गिब्जचा गंभीर आरोप | खेळात राजकीय अजेंड्याचाही आरोप
बीसीसीआयचे सचिव आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा मुलगा जय शहा यांच्यावर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्षल गिब्जने गंभीर आरोप केले आहेत. काश्मीर प्रिमीअर लिगमध्ये मी सहभाग घेऊ नये म्हणून बीसीसीआय आपल्यावर दबाव टाकत असल्याचं गिब्जने म्हटलंय.
3 वर्षांपूर्वी -
मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय
टोकियो ऑलिम्पिकमधून सध्या मोठी बातमी समोर येत आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूचे पदक सुवर्णात रूपांतरीत होऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या क्रमांकावर असलेल्या चिनी अॅथलीट होउ जिहूईवर डोपिंगचा संशय आहे. अँटी-डोपिंग एजन्सीने होउचे सँपल-B चाचणीसाठी बोलवले आहेत. तिचा सँपल-A क्लिन नाही असे मानले जात आहे.
3 वर्षांपूर्वी -
Tokyo Olympics 2020 | वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने भारताला मिळवून दिले पहिले पदक | रौप्यपदक जिंकले
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले पदक जिंकले आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 किलो वजन गटात एकूण 202 किलोग्रॅम वजन उचलून रौप्य पदक जिंकले. चीनच्या हौ झीहुईने 210 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. इंडोनेशियाच्या कांटिका विंडीने कांस्यपदक जिंकले.
3 वर्षांपूर्वी -
भारत V/S श्रीलंका पहिला वनडे | लंकेची प्रथम फलंदाजी, 4 षटकांमध्ये स्कोअर 23/0
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून कोलंबोमध्ये भारताविरुद्ध खेळल्या जाणार्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात फलंदाजीचा निर्णय घेतला. सध्या सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि मिनोद भानुका क्रीजवर आहेत. श्रीलंकेने 4 षटकांत 23 धावा केल्या. ईशान किशनचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवशी तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे.
3 वर्षांपूर्वी -
ICC Cricket T20 World Cup 2021 | T-20 वर्ल्ड कपच्या तारखा जाहीर
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी यंदाच्या टी-२० वर्ल्डकपचे ठिकाण आणि तारीख जाहीर केली आहे. यावेळी टी-२० वर्ल्डकप यूएई आणि ओमानमध्ये आयोजित केला जाईल. १७ ऑक्टोबरला वर्ल्डकपचा पहिला सामना खेळवला जाईल. तर अंतिम सामना १४ नोव्हेंबरला होणार आहे. करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा भारतातून बाहेर आयोजित केली जाणार आहे. आयसीसीच्या म्हणण्यानुसार ही स्पर्धा भारतात होणार नसली, तरी बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करेल.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | ख्रिस्तियानो रोनाल्डोची ६ सेंकदांची कृती | आणि कोका-कोलाला २९ हजार कोटींचं नुकसान
पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोची पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेला संघाचे व्यवस्थापक फर्नांडो देखील उपस्थित होते. पत्रकार परिषदेत टेबलावर कोका कोलाची बाटली ठेवण्यात आली होती. हे पाहून रोनाल्डो भडकला. त्याने त्या बाटल्या टेबलावरून बाजूला केल्या. त्यानंतर त्याने बाजूला असलेली पाण्याची बाटली हातात घेत ओरडून ‘शीत पेये नाही, पाणी प्यायची सवय करा’ असे पत्रकारांना सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2021 | आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने यूएईत होणार - BCCI
कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलबाबत (IPL 2021 UAE) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार आहेत. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पैलवान सागर मर्डर केस | सुशील कुमारचा छत्रसाल स्टेडिअममधील मारहाणीचा VIDEO आला समोर
छत्रसाल स्टेडियममध्ये ज्युनिअर राष्ट्रीय पैलवान सागर रानाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 2 वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यात ऑलिम्पियन सुशील कुमार मित्रांसोबत सागरला हॉकी स्टिकने मारहाण करताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सुशील कुमारने स्वत: मित्राच्या मोबाइलवरून हा व्हिडिओ शूट करून घेतला होता, जेणेकरून कुस्तीच्या सर्कीटमध्ये त्याचा वचक राहील.
4 वर्षांपूर्वी -
शेवटी खेळाडूंना कोरोना झालाच | नेहमीच लक्षात ठेवा, राजकुमाराने लोकांच्या जिवापेक्षा मनोरंजनला प्राधान्य दिले - काँग्रेस
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अखेर आयपीएलचे पूर्ण सीझन स्थगित करण्यात आले आहे. 7 खेळाडूंसह काही स्टाफ मेंबर्सला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. अशात आयपीएलचे सीझन रद्द करावे अशी मागणी सगळीकडून केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट बोर्डाने आयपीएल सस्पेंड करण्याचा निर्णय घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन असलेल्या राज्य व शहरांमध्ये IPL सुरु, कारण IPL अमित शहांचा मुलगा ऑपरेट करतो - काँग्रेस
देशात कोरोनामुळे परिस्थिती बिघडत असताना दिसत आहे. गुरुवारी पहिल्यांदा एका दिवसात 3 लाख 86 हजार 854 नवीन रुग्ण आढळले. आतापर्यंत एका दिवसाच्या आत मिळालेल्या नवीन रुग्णांचा हा आकडा सर्वात जास्त आहे. यापूर्वी 28 एप्रिलला सर्वात जास्त 3.79 लाख रुग्णांची ओळख झाली.
4 वर्षांपूर्वी -
विराटची 77 धावांची धडाकेबाज खेळी | इंग्लंडसमोर 157 धावांचे आव्हान
भारत आणि इंग्लंडदरम्यान 5 टी-20 सीरीजचा तिसरा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू आहे. इंग्लंडने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय टीमने इंग्लंडसमोर 157 धावांचे आव्हान दिले आहे. भारतीय संघाने अखेरच्या 5 ओव्हरमध्ये 69 धावा केल्या. दरम्यान, कर्णधार विराट कोहलीने टी-20 करिअरचे 27वे अर्धशतक झळकावले आहे.
4 वर्षांपूर्वी -
विराटने रोहित शर्माला वगळल्याने समाज माध्यमांवर टीका | मुंबई इंडियन्सनं केलं ट्विट
आयपीएल स्पर्धेत मंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहितला वगळण्यात आल्यानंतर मुंबई इंडियन्सने रोहितबाबत एक ट्विट केले. या ट्विटमध्ये मुंबई इंडियन्सने म्हटले आहे की, “रोहितला पहिल्या काही टी-२० सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आलेली आहे.”
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पोलार्डने ठोकले एका ओव्हरमध्ये ६ सिक्स | युवराज सिंगच्या रेकॉर्डची बरोबरी
वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका अशी तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात इतिहास रचला गेला आहे. वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डने युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याने एका षटकात ६ षटकार खेचले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
नरेंद्र मोदी स्टेडियमवरील पहिल्या मॅचमध्ये रिलायन्स एन्ड आणि अदानी एन्डची चर्चा
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे. स्टेडियमचं नामकरणं नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद असं करण्यात आलं आहे. याच मैदानावर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना प्रकाशझोतात रंगणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
अहमदाबाद | सरदार वल्लभभाई पटेलांच्या नावाला बगल | ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असं नामांतर
जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे. स्टेडियमचं नामकरणं नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद असं करण्यात आलं आहे. याच मैदानावर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना प्रकाशझोतात रंगणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPL Auction 2021 | अर्जुन तेंडुलकर २० लाखांच्या बेस प्राईजमध्ये मुंबई इंडियन्स'मध्ये
IPL Auction 2021 महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन आता इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वात मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. गुरुवारी चेन्नईत पार पडलेल्या खेळाडूंच्या लिलावात MIनं अर्जुनला २० लाखांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. अनकॅप खेळाडूंमध्ये अर्जुनचं नाव न आल्यानं सर्व बुचकळ्यात पडले होते, परंतु मुंबई इंडियन्सनं त्याला शॉर्ट लिस्ट करून अखेरच्या फेरीसाठी राखून ठेवले आणि लिलावातील शेवटचं नाव हे अर्जुनचेच होते. मुंबई इंडियन्स या एकमेव संघानं त्याच्यासाठी बोली लावली.
4 वर्षांपूर्वी -
IPL Auction 2021 | अष्टपैलू ख्रिस मॉरिस ठरला सर्वात महाग खेळाडू
दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसने (Chris Morris) आयपीएलच्या हंगामात इतिहास रचला आहे. ख्रिस मॉरिसला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली (Chris Morris IPL bid price) लागली आहे. ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) तब्बल 16 कोटी 25 लाख मोजले आहेत. मॉरीसला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि मुंबई इंडियन्सही स्पर्धेत होती. पण अखेर मोठी रक्कम मोजत मॉरीसला राजस्थानने आपल्या ताफ्यात घेतलं आहे. मॉरिसची बेस प्राईजही 75 लाख रुपये इतकी होती.
4 वर्षांपूर्वी -
IND vs ENG | भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय
टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या कसोटी सामन्यात 317 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात मोईल अलीने सर्वाधिक 43 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर लोकल बॉय आर अश्विनने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट्स मिळवल्या. या विजयासह टीम इंडियाने 4 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Ind Vs Eng 2nd Test | अश्विनने ५ बळी टिपले | दुसऱ्या दिवसअखेर भारत १ बाद ५४
पहिल्या डावात भारताने ३२९ धावा केल्यानंतर इंग्लंडचा डाव अवघ्या १३४ धावांमध्ये आटोपला. रविचंद्रन अश्विनने पाच बळी घेत पहिल्या डावाअखेर भारताला १९५ धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या डावात भारताचा सलामीवीर शुबमन गिल (१४) लवकर बाद झाला. पण रोहित शर्मा (२५*) आणि चेतेश्वर पुजारा (७*) या दोघांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत फलंदाजी केली आणि भारताला २४९ धावांची आघाडी मिळवून दिली.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो