महत्वाच्या बातम्या
-
IND vs AUS | भारतीय गोलंदाजांची धुलाई | भारताला विजयासाठी हव्यात ३७५ धावा
यजमान ऑस्ट्रेलियाने पाहूण्या भारतीय संघाचे धमाकेदार स्वागत केले आहे. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात (India Vs Australia First One Day Cricket Match) ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ६ बाद ३७५ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार एरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शानदार शतकी खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक केले.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | IPL 2020 | कार्तिकचा भन्नाट कॅच पाहिलात का
आयपीएल (IPL 2020) च्या प्ले-ऑफच्या रेसमधून कोलकाता (KKR)ने राजस्थान (Rajasthan Royals) ला बाहेर काढलं आहे. कोलकात्याने राजस्थानवर 60 रनने दणदणीत विजय मिळवला आहे. या मॅचमध्ये कोलकात्याचा विकेट कीपर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)ने घेतलेला अफलातून कॅच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 35 वर्षांचा असलेल्या दिनेश कार्तिकने एखाद्या तरुणाला लाजवेल असा भन्नाट कॅच पकडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020 | मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा धुव्वा
Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वातील प्ले ऑफचं तिकिट पक्क करणाऱ्या मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सला ( Delhi Capitals) मोठा धक्का दिला. IPL 2020च्या पहिल्या हाफमधील खेळ पाहता दिल्ली प्ले ऑफमध्ये सहज प्रवेश करतील असे वाटले होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यात DCला सलग चार पराभव पत्करावे लागले आणि त्यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. MIच्या गोलंदाजांसमोर त्यांनी लोटांगण घातले. MIने अगदी सहज हा सामना जिंकला.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | ख्रिस गेल ९९ धावांवर बाद झाला | आणि संतापला
IPL 2020 आयपीएलच्या १३व्या हंगामात काल राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेल (Chris Gayle) ने धडाकेबाज खेळी केली. पण त्याचे शतक एका धावाने हुकले. गेल ९९ धावांवर बाद झाला. या सामन्यात गेलने ८ षटकार मारले आणि टी-२० प्रकारात १ हजार षटकारांचा टप्पा पार केला.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | विकेटच मिळत नाही | कंटाळलेल्या विराटची सूर्यकुमारला टशन
सूर्यकुमार यादवच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबई (Mumbai Indians)ने बँगलोर (RCB)चा 5 विकेटने पराभव केला आहे. बँगलोरने ठेवलेल्या 165 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मुंबईकडून क्विंटन डिकॉक आणि इशान किशन ओपनिंगला बॅटिंगसाठी आले. या दोघांनाही चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. सूर्यकुमार यादवने मात्र एकहाती किल्ला लढवत मुंबईला विजय मिळवून दिला. सूर्या (Suryakumar Yadav) ने 43 बॉलमध्ये नाबाद 79 रन केले, यामध्ये 10 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. बँगलोरकडून मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल याला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर क्रिस मॉरिसने 1 विकेट घेतली.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020 Live | CSK Vs MI | चेन्नईसाठी हा सामना करो या मरो
(IPL 2020) 13व्या मोसमातील 41 वा सामना आज खेळला जाणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जस (Chennai Super Kings) यांच्यात खेळण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना शारजा आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात चेन्नईसाठी विजय अत्यावश्यक असणार आहे. या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला तर, चेन्नई या स्पर्धेतून बाहेर पडेल. त्यामुळे चेन्नईसाठी हा सामना ‘करो या मरोचा’ असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | आणि फिंचने दिलेली शिवी स्टम्प माइकमध्ये कैद झाली
शारजाह येथे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने ८२ धावांनी विजय मिळवला. मात्र सामन्यात अशी एक गोष्ट घडली, जी चाहत्यांच्या नजरेतून दडली नाही. सामन्यादरम्यान बेंगलोरचा सलामीवीर फलंदाज ऍरॉन फिंचने कोलकाताच्या आंद्रे रसेलला शिवीगाळ केली. त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | डिविलियर्सने मारलेला चेंडू थेट मैदानाबाहेरील चालत्या कारवर
आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 28 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने कोलकाता नाईट रायडर्सला 82 धावांनी पराभूत केले. आरसीबीच्या विजयाचा नायक ठरलेला आक्रमक फलंदाज एबी डिविलियर्सने या सामन्यात विस्फोटक फलंदाजी केली. त्याने 33 चेंडूत नाबाद 73 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. या खेळीदरम्यान त्याने मैदानाबाहेर एक षटकार मारला आणि चेंडू रस्त्यावरून जाणाऱ्या कारवर जाऊन आदळला. डिविलियर्सने मारलेल्या या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020 | पाहा सध्या कोण आहे ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी
आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. तर पर्पल कॅप हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला दिली जाते. आयपीएल २०२० मधील २८ वा सामना सोमवारी (१२ ऑक्टोबर) शारजाह येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात बेंगलोरने ८२ धावांनी विजय मिळवला. हा बेंगलोरचा या हंगामातील पाचवा विजय आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020 | विराट - डिविलियर्सची जोडीच वरचढ, गाठला पहिला नंबर
इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील २८वा सामना सोमवारी (१२ ऑक्टोबर) झाला. शारजाहच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झालेल्या या सामन्यात विराट कोहली आणि एबी डिविलियर्सच्या फलंदाजी जोडीने शानदार भागीदारी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाढदिवशी शुबमनकडून साराला नाही मिळालं हवं ते गिफ्ट | नेटिझन्सला दिली 'ट्रोल' संधी
आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 28 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने कोलकाता नाईट रायडर्सचा 82 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने 2 बाद 195 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल कोलकाताला 20 षटकांत केवळ 119 धावा करता आल्या. या सामन्यात कोलकाताचा युवा सलामीवीर शुबमन गिल काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने 25 चेंडूत 34 धावा केल्या.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020 | यंदा रोहित, पोलार्ड नाही तर ‘या’ खेळाडूने ठोकले सर्वाधिक षटकार
आयपीएलच्या 13 व्या हंगामात आतापर्यंत काही अटीतटीचे सामने पाहायला मिळाले. केवळ एका षटकारानेही सामन्याचे चित्र बदलताना आपण पाहिले आहे. या हंगामातही षटकारांचा पाऊस पडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही दिग्गज फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात. परंतु या हंगामात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि टी20 चा स्टार फलंदाज कायरान पोलार्ड यांच्यासारखे दिग्गज जास्तीत जास्त षटकार मारण्याच्या शर्यतीत मागे पडले आहेत. आयपीएलमध्ये आतापर्यंत कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक षटकार मारले आहेत ते आपण पाहूया.
4 वर्षांपूर्वी -
ख्रिस गेलची इस्पितळात सुद्धा पब स्टाईल मज्जा | पोस्ट टाकत म्हणाला...
किंग्स इलेव्हन पंजाबचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याता आहे. गेलचा हॉस्पिटलमधला एक फोटो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मी लढल्याशिवाय हरणार नाही, असेही गेलने यावेळी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020 | मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय
मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबाद विरुद्धची मॅच ३४ धावांनी जिंकली. याआधी मुंबई इंडियन्सने दिलेल्या २०९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबादने २० ओव्हरमध्ये ७ बाद १७४ धावा केल्या.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020 | मुंबईने नाणेफेक जिंकली | आरसीबी करणार पहिली फलंदाजी
मुंबईने नाणेफेक जिंकली, आरसीबी करणार पहिली फलंदाजीआबुधाबी, IPL 2020: विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही आज आयपीएलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स बाजी मारते की आरसीबीचा संघ विजय मिळवतो, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
4 वर्षांपूर्वी -
सुनील गावस्कर यांच्या विधानावर अनुष्का शर्माची भली मोठी पोस्ट
माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी विराटच्या कामगिरीवर टिप्पणी करताना केलेल्या टीकेमुळे वाद निर्माण झाला आहे. आरसीबी आणि पंजाबमधील सामन्यादरम्यान समालोचन करताना सुनील गावसकर यांनी विराटवर टीका करताना अनुष्काचाही उल्लेख केला. विराटची सुमार कामगिरी बघून गावसकर यांनी “ल़ॉकडाउन था तो सिर्फ अनुष्का के बोलिंग कि प्रॅक्टिस की इन्होंने” असं म्हटलं. गावसकर यांनी उपरोधिकपणे टीका केल्याने अनुष्का शर्मा नाराज झाली असून तिने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020: सनरायझर्स हैदराबादला धक्का | अष्टपैलू खेळाडू स्पर्धेबाहेर
पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या सनराईजर्स हैदराबाद संघाला एक मोठा धक्का बसला. गोलंदाजीदरम्यान दुखापत झालेला अष्टपैलू मिचेल मार्श संपूर्ण हंगामाला मुकण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानंतर आता हैदराबाद संघाने अधिकृतरित्या ट्विटरवरून त्याला माघार घ्यावी लागणार असल्याची बातमी दिली. “मिचेल मार्श पायाच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेला मुकणार आहे. तो लवकरात लवकर तंदुरूस्त होवो हीच प्रार्थना. वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर याला मार्शच्या जागी बदल खेळाडू म्हणून ताफ्यात दाखल करून घेण्यात आले आहे”, असे ट्विट सनरायझर्सकडून करण्यात आले.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020 | RR vs CSK | राजस्थानला धक्का | संघातील दोन स्टार खेळाडू खेळणार नाहीत
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाला झोकात प्रारंभ करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचे राजस्थान रॉयल्सविरुद्ध मंगळवारी होणाऱ्या लढतीत पारडे जड मानले जात आहे. बेन स्टोक्स आणि जोस बटलर पहिल्याच लढतीला मुकणार असल्याने राजस्थानची भिस्त कर्णधार स्टीव्ह स्मिथ आहे.
4 वर्षांपूर्वी -
सौरव गांगुली भाजपच्या वाटेवर ? | प. बंगालच्या मैदानात उतरण्याची चर्चा
पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही परिस्थितीत कमळ फुलवायचे यासाठी भाजपची मंडळी आतापासूनच कामाला लागले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये खरा सामना सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपला यश मिळवून देण्याची जबाबदारी शहा यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | ख्रिस गेलची कोरोना टेस्ट निगेटिव्ह | IPL'मध्ये खेळणे तळ्यात मळ्यात
जमैकाचा जगातील सर्वोत्तम धावपटू उसेन बोल्टला करोनाची बाधा झाली आहे. बोल्टने नुकताच त्याचा ३४वा वाढदिवस सुरक्षित अंतराचे कोणतेही नियम न पाळता मित्रमंडळींसोबत साजरा केला होता. त्यानंतरच बोल्टला करोना झाल्याचे सिद्ध झाले आहे. बोल्टच्या त्या वाढदिवसाच्या पार्टीत इंग्लंडचा अव्वल फुटबॉलपटू रहिम स्टर्लिगदेखील उपस्थित होता. बोल्टच्या वाढदिवसाच्या पार्टीत मोठय़ा संख्येने त्याची मित्रमंडळी उपस्थित होती आणि एकत्र जल्लोष करत होती. सध्या बोल्ट स्वयं-विलगीकरणात आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 45% पर्यंत परतावा - NSE: TataMotors
- Naga Chaitanya Sobhita Dhulipala | दक्षिणात्य सुपरस्टार लवकरच बांधणार लग्नगाठ, लग्नाआधीच्या विधींचे फोटोज वायरल
- NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर तेजीत धावणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NTPC
- Smart Investment | तुमच्या लेकीच्या भविष्यासाठी मिळेल 50 लाखांचा फंड, फायद्याच्या योजनेत बचत करा, खर्चाची चिंता मिटेल
- Infosys Share Price | इन्फोसिस सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळणार मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: INFY
- BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल 45% परतावा, ब्रोकरेजने दिली BUY रेटिंग - NSE: BHEL
- Tata Power Share Price | टाटा पॉवर सहित या 10 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल तगडा परतावा - NSE: TATAPOWER
- Car Loan EMI | या दिवाळीत स्वप्नातली कार खरेदी करताय, हे 4 उपाय EMI चं टेन्शन दूर करतील, लवकर फिटेल कर्ज - Marathi News
- Trending Video | फिरायला गेलेले जोडपे अडकले लांडग्यांच्या विळख्यात, पुढे असं घडलं की विश्वास बसणार नाही, पहा व्हिडिओ
- iPhone 16 | आता iPhone 16 खरेदी करा ते सुद्धा 10 हजाराच्या सूटवर, झटपट फोन हातात, इथून करा ऑर्डर - Marathi News