महत्वाच्या बातम्या
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींच महेंद्रसिंग धोनीला प्रशंसा पत्र
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्टला आपली निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या निवृत्तीची दखल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे. मोदींनी जर धोनीला भारताकडून खेळायला सांगितले तर तो नक्कीच पुन्हा ब्ल्यू जर्सीमध्ये दिसू शकतो. त्यामुळे मोदी यांनी धोनीला पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं आहे, ते पाहा…
4 वर्षांपूर्वी -
IPL 2020 | Dream 11'ने २२२ कोटींना मुख्य प्रायोजकत्व मिळवलं
IPL 2020 च्या मुख्य प्रायोजकत्वाची (Title Sponsorship) माळ कोणाच्या गळ्यात पडणार हा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. Dream 11 यांनी २२२ कोटींना मुख्य प्रायोजकत्व मिळवलं आहे. Tata Sons, Byju’s, Unacademy हे ब्रँडची शर्यतीत होते. पण अखेर Dream 11 ने बाजी मारली. त्यामुळे आता १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान Dream 11 IPL 2020 ही बहुप्रतिक्षित स्पर्धा रंगणार आहे. IPL आयुक्त ब्रिजेश पटेल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचं निधन | कोरोनाची लागणही झाली होती
भारताचे माजी क्रिकेटपटू आणि उत्तरप्रदेशातील मंत्री चेतन चौहान यांचं निधन आज निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. चेतन चौहान यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागणीही झाली होती. त्यानंतर त्यांच्या किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. परंतु आज हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. चेतन चौहान यांचे बंधू पुष्पेंद्र चौहान यांनी चेतन चौहान यांचं निधन झाल्याची माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
Thank You MSD | महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर १५ ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा त्याने अनेकदा हातातून गेली अशी वाटणारी जिंकलेली मॅच असो धोनीचा खेळ क्रिकेटरसिक कधीही विसरणार नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
UAE IPL 2020 खेळवण्यासाठी केंद्र सरकारकडून मान्यता – ब्रिजेश पटेल
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) ) इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल 2020) संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयपीएल यूएईत खेळवण्यासाठी सरकारकडून मान्यता मिळाल्याची माहिती गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. त्यामुळे १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत यूएईत आयपीएल खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीसीसीआयच्या माहितीनंतर 8 फ्रँचायझींनी खेळाडूंना क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पटेल यांनी सांगितले की,”आम्हाला लेखी परवानगी मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIVO कंपनीसोबतचा करार स्थगित, नव्या स्पॉन्सरशिपसाठी Jio कंपनी पुढे येऊ शकते
१९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये रंगणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगासाठी बीसीसीआयने VIVO या चिनी मोबाईल कंपनीसोबतचा करार मोडला आहे. यासंदर्भात आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने परिपत्रक जाहीर करत माहिती दिली आहे. २०१८ साली बीसीसीआय आणि VIVO कंपनीचा ५ वर्षांचा करार झाला होता. आयपीएल स्पर्धेच्या स्पॉन्सरशिपसाठी VIVO ने बीसीसीआयला २१९९ कोटी रुपये दिले होते. प्रत्येक हंगामाला VIVO कंपनी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होती.
4 वर्षांपूर्वी -
आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली: बीसीसीआय
कोरोना व्हायरस संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रिमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेची सुरुवात १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशातील एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आयपीएलच्या नियामक परिषदेकडून शनिवारी शिक्कामोर्तब केले जाईल, अशी माहिती मिळते आहे. आयपीएलच्या नियामक परिषदेची बैठक शनिवारी होते आहे.
5 वर्षांपूर्वी -
ICC Women's T20 WC Final: भारताला नमवून ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन
आयसीसी टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला अंतिम सामना भारताने ८५ धावांनी गमावला. या पराभवासह पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. तर, ऑस्ट्रेलियानं तब्बल ५ वेळा टी-२० वर्ल्ड कप जिंकण्याचा विक्रम केला. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ ९९ धावांवर ढेपाळला.
5 वर्षांपूर्वी -
T20 Women's World Cup : सामना न खेळूनही टीम इंडियाने घडवला इतिहास
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यापासून आता केवळ एक पाऊलं दूर आहे. आज भारत-इंग्लंड यांच्यात सेमीफायनल सामना होणार होता. मात्र पावसामुळं हा सामना रद्द झाला. त्यामुळ आयसीसीच्या नियमामुळे भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. एकही चेंडू न खेळता हा सामना रद्द झाला.
5 वर्षांपूर्वी -
IND vs NZ 2nd Day : सर्व भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो दुसऱ्या दिवशी सुरूच
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याची संधी गमावली आहे. पहिल्या डावात न्यूझीलंडला २३५ धावांत बाद केल्यानंतर भारतीय संघाला ७ धावांची नाममात्र आघाडी मिळाली. मात्र दुसऱ्या डावातही भारतीय डावाची अक्षरशः घसरगुंडी उडाली. ट्रेंट बोल्ट आणि इतर न्यूझीलंड गोलंदाजांच्या भन्नाट माऱ्यासमोर टीम इंडियाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताची अवस्था ६ बाद ९० अशी झालेली असून सध्या संघाकडे ९७ धावांची आघाडी आहे. हनुमा विहारी आणि ऋषभ पंत हे फलंदाज सध्या खेळपट्टीवर असून तिसऱ्या दिवशी हे फलंदाज भारताची आघाडी कितीने वाढवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
Ind vs NZ 2nd Test : भारताचा पहिला डाव २४२ धावांत आटोपला
ख्राईस्टचर्च कसोटीतही भारतीय फलंदाजांनी मोक्याच्या क्षणी केलेल्या हाराकिरीचा फटका संघाला बसला आहे. चहापानाच्या सत्रानंतर भारतीय संघाची न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर अक्षरशः घसरगुंडी उडाली, ज्यामुळे पहिल्या दिवशी भारतीय संघ २४२ धावांत गारद झाला. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलत भारतीय फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधीच दिली नाही.
5 वर्षांपूर्वी -
India VS Bangladesh : भारताचा बांगलादेशवर १८ धावांनी दमदार विजय
आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा विजयी धडाका सुरूच आहे. भारताने आज बांगलादेशला १८ धावांनी मात देत स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. या सामन्यातही पूनम यादवने आपल्या फिरकीची जादू दाखवत बांगलादेशच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. सोळा वर्षीय सलामीवीर शेफाली वर्मा आजच्या सामन्याची मानकरी ठरली. शेफालीने १७ चेंडूत ३९ धावांची तडाखेबंद खेळी केली.
5 वर्षांपूर्वी -
T20 WC 2020 Ind Vs Aus : ऑस्ट्रेलियाचे लोटांगण; भारताची विजयी सलामी
पूनम यादवच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारताने ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे लक्ष्य दिले होते. पण गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा ११५ धावांवर ऑल आऊट केला.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राचा राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक विजेता बॉक्सर प्रणव राऊतची आत्महत्या
अकोला जिल्ह्यातील बॉक्सरपटू प्रणव राऊत याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अकोला जिल्ह्यातील शास्त्री स्टेडीयम जवळ असलेल्या क्रीडा प्रबोधिनीत त्याने गळफास घेतला. प्रणव राऊत हा राष्ट्रीय पातळीवरील सूवर्णपदक विजेता खेळाडू आहे. जानेवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणवने सुवर्णपदक जिंकले होते. त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर क्रीडा वर्तुळातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज (शुक्रवार, २१ फेब्रुवारी) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
5 वर्षांपूर्वी -
Under-19 World Cup IND Vs PAK: पाकला घरचा रस्ता, टीम इंडिया फायनलमध्ये
१९ वर्षाखालील आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताच्या युवा संघाने पाकिस्तानच्या युवा संघाचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. पाकिस्तानने दिलेले १७३ धावांचे आव्हान टीम इंडियाने १० गडी राखून सहजपणे पार केले. भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने या महत्त्वाच्या सामन्यात शतकी खेळी साकारली. तर, दिव्यांश सक्सेनाने नाबाद ५९ धावांची खेळी साकारली.
5 वर्षांपूर्वी -
Ind vs NZ 3rd T20I : न्यूझीलंड'समोर विजयासाठी १८० धावांचे आव्हान
तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकल्यानंतर भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. रोहित शर्मा आणि के एल राहुलने भारताला आक्रमक सुरूवात करून दिली. रोहित शर्मी-राहुलने ८९ धावांची भागिदारी केली. सलामीची जोडी फुटल्यानंतर भारताच्या ठरावीक अंतराने विकेट पडल्या. शिवम दुबेला कर्णधाराने तिसऱ्या स्थानावर पाठवले. मात्र, त्याला याचा फायदा घेता आला नाही.
5 वर्षांपूर्वी -
प्रख्यात बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा भाजपमध्ये प्रवेश
भारताची ‘फुलराणी’ अर्थात प्रख्यात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल राजकारणाच्या ‘कोर्टात’ उतरली आहे. राजधानी दिल्लीत सायना नेहवालने भाजपमध्ये प्रवेश केला. सायनासोबतच तिची बहीण चंद्रांशू हिनेही भाजपचा झेंडा हाती धरला. सायनाच्या रुपाने आणखी एक क्रीडापटू राजकारणातून सेकंड इनिंग सुरु करत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सायनाच्या रुपाने भारतीय जनता पक्षाला ‘स्टार प्रचारक’ मिळाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
Ind vs NZ, 1st T20 : पहिल्या सामन्यात भारताचा न्यूझीलंडवर विजय
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी २० मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला टी २० सामना न्यूझीलंडमधील ऑकलंड इथं होत आहे. या सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दरम्यान, अवघ्या ४५ मिनिटात टीम इंडियाचं विश्वविजयाचं स्वप्न भंग करणाऱ्या न्यूझीलंडचा बदला घेण्याची वेळ आली आहे. वन डे विश्वचषक २०१९ मध्ये न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा टीम इंडिया काढते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
India Vs New Zealand T-२०: झीलंडचे टीम इंडियाला २०४ धावांचे आव्हान
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील 5 सामन्यांच्या टी २० मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला टी २० सामना न्यूझीलंडमधील ऑकलंड इथं होत आहे. या सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दरम्यान, अवघ्या ४५ मिनिटात टीम इंडियाचं विश्वविजयाचं स्वप्न भंग करणाऱ्या न्यूझीलंडचा बदला घेण्याची वेळ आली आहे. वन डे विश्वचषक २०१९ मध्ये न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा टीम इंडिया काढते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
फोटो: या भारतीय महिला क्रिकेटपटूच्या सौंदर्यापुढे बॉलिवूडच्या अभिनेत्री सुद्धा कमी पडतील
बॉलिवूड अभिनेत्री या नेहमी अत्यंत ग्लॅमरस अंदाजात असतात. त्या त्यांच्या सौंदर्याने अनेकांची मने जिंकतात. पण भारतीय महिला संघातील एका खेळाडूने या अभिनेत्रींनाही मागे टाकले. तिचे नाव प्रिया पुनिया. चला पाहुया प्रिया पुनियाचा ग्लॅमरस अंदाज. प्रिया पुनिया भारतीय महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम