22 December 2024 6:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

मोदींचा नवा भारत? | गुणवत्ता नव्हे तर पी व्ही सिंधूची जात शोधत आहे गूगलवर | ही राज्य आघाडीवर

PV Sindhu

मुंबई, ०३ ऑगस्ट | टोक्यो ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या ताय झू-यिंगने जगज्जेत्या सिंधूला धूळ चारली. त्यामुळे पाच वर्षांची मेहनत आणि प्रदीर्घ प्रतीक्षेनंतरही सिंधूचे ‘सुवर्णस्वप्न’ अधुरेच राहिले. २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये सिंधूला अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरिनकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे सुवर्णसंधी हुकणे काय असते हे सिंधूलाही चांगलेच ठाऊक आहे.

मात्र सध्या गुगल ट्रेंडमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या पी. व्ही. सिंधूची जात शोधली जात आहे. गुगलवर कोण काय शोधत आहे? सध्या काय ट्रेंड होत आहे याची संपूर्ण माहिती trends.google.com यावर मिळते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूने 1 ऑगष्ट रोजी कांस्यपदक जिंकल्यानंतर लोकांनी pv sindhu caste गुगलवर शोधायला सुरुवात केली आहे.

‘हे’ राज्य आहेत आघाडीवर
सोशल मीडिया वापरकर्त्यांचे आरोप आहे की, पी. व्ही. सिंधूने पदक जिंकल्यानंतर ती कोणत्या प्रतिस्पर्धीसोबत पदक जिंकली. त्याची लाईफ स्टाईल काय आहे? तीचे गुरु कोण? तीने कसे संघर्ष केले यापेक्षा तीची जात काय? हे जाणून घेण्यात लोकांना सर्वात कमी जास्त रस आहे. पी. व्ही. सिंधूची जात शोधण्यात आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, अरुणाचल प्रदेश राज्य आघाडीवर आहेत.

गुगलवर सर्वप्रथम पी व्ही सिंधूची जात 2016 मध्ये शोधण्यात आली होती. यावेळी सिंधूने रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. परंतु, 1 ऑगष्टनंतर यामध्ये 90 टक्के वाढ झाली आहे. हे आपल्याला गुगल ट्रेंडच्या काही ग्राफवरुन लक्षात येईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: PV Sindhu Lovlinas caste religion trend on google search news updates.

हॅशटॅग्स

#Sports(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x