26 December 2024 7:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK EPFO Pension Alert | खाजगी नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर, नव्या वर्षात पेन्शन वाढणार, जाणून घ्या फायद्याची अपडेट IRFC Share Price | रेल्वे स्टॉक IRFC सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
x

T20 WC 2020 Ind Vs Aus : ऑस्ट्रेलियाचे लोटांगण; भारताची विजयी सलामी

ICC Womens T20 World Cup

सिडनी: पूनम यादवच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कपमधील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारताने ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे लक्ष्य दिले होते. पण गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा ११५ धावांवर ऑल आऊट केला.

अनुभवी फिरकीपटू पूनम यादव हिच्या चार बळींच्या जोरावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियाला धावांनी पराभूत केले. जेमायमा रॉड्रीग्ज (२६) आणि दिप्ती शर्मा (४९*) या दोघींच्या भागीदारीच्या जोरावर भारताने २० षटकात ४ बाद १३२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे आव्हान दिले. आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर हेली हिने अर्धशतकी केली, पण पूनम यादवच्या फिरकीपुढे यजमान ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. या विजयासह भारताने स्पर्धेत विजयी सलामी दिली.

भारतीय महिलांनी दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. मात्र पूनम यादवच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियन महिला फलंदाजांचा निभाव लागला नाही. तिने चार षटकात १७ धावा खर्च करत चार विकेट घेत भारताच्या हातून निसटलेला सामना भारताच्या बाजूने वळवला. ऑस्ट्रेलियाकडून सलामीची फलंदाज एलिसा हिली (५१) आणि अ‍ॅश्ले गार्डनरने ३४ धावा केल्या. त्यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणालाही समाधानकारक खेळी करता आली नाही. भारताकडून पूनम यादवने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. शिखा पांडेला तीन तर राजेश्वरी गायकवाडला एक विकेट मिळाली.

 

Web Title: Story India beat defending champions Australia by 17 runs in the opening match of ICC Womens T20 World Cup at Sydney.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x