24 November 2024 8:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

मीराबाईला मिळू शकते सुवर्ण पदक | वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीटवर डोपिंगचा संशय

Mirabai Chanu

नवी दिल्ली, २६ जुलै | टोकियो ऑलिम्पिकमधून सध्या मोठी बातमी समोर येत आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूचे पदक सुवर्णात रूपांतरीत होऊ शकते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या क्रमांकावर असलेल्या चिनी अ‍ॅथलीट होउ जिहूईवर डोपिंगचा संशय आहे. अँटी-डोपिंग एजन्सीने होउचे सँपल-B चाचणीसाठी बोलवले आहेत. तिचा सँपल-A क्लिन नाही असे मानले जात आहे.

चिनी अॅथलिट होउ जिहूई आज आपल्या देशात परत येणार होती, परंतु तिला थांबण्यास सांगितले गेले आहे. कोणत्याही वेळी तिची डोपिंग टेस्ट होऊ शकते. ऑलिम्पिकच्या इतिहासात यापूर्वी असे घडले आहे जेव्हा डोपिंग अयशस्वी झाल्यानंतर एखाद्या खेळाडूचे पदक काढून दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला देण्यात आले होते. तर मीराबाई भारतात परतली आहे. दिल्ली विमानतळावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.

वेटलिफ्टिंग फेडरेशनने सांगितले?
वेटलिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्ण जिंकणार्‍या चिनी होउ च्या A-सँपलमध्ये शंका आल्यामुळे तिला आता B-सँपलसाठी बोलावण्यात आले आहे. चिनी खेळाडूचा बी-सँपल पॉझिटिव्ह आला, तर IOC आणि टोकियो आयोजन समितीद्वारे याची घोषणा केली जाईल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Tokyo Olympics 2020 Mirabai Chanu gold medal chance China weightlifter facing doping Test news updates.

ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा: Click Here to Download

हॅशटॅग्स

#Sports(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x