4 January 2025 3:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Business Idea | कमी पैशांत स्वस्तात मस्त व्यवसाय सुरू करायचा आहे, हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा, दररोज कमाई होईल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: SUZLON IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरवर ब्रोकरेजकडून 'BUY' कॉल, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: AWL SJVN Share Price | एसजेव्हीएन स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, PSU शेअर मालामाल करणार, स्टॉक BUY करावा का - NSE: SJVN IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करतोय, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
x

इतिहास रचला | नीरज चोपडाने भारताला अ‍ॅथलेटिक्समध्ये आतापर्यंतचे पहिले मेडल मिळवून दिले

Tokyo Olympics 2020

नवी दिल्ली, ०७ ऑगस्ट | अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकण्यासाठी भारताची 121 वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. भाला फेकणारा नीरज चोप्रा याने या खेळात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याने अंतिम फेरीत 87.58 मीटर थ्रो करत सुवर्ण पटकावले. नीरजने पहिल्या प्रयत्नात 87.03 मीटर आणि दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर भाला फेकला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात 76.79 मीटर भाला फेकला, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फाऊल आणि 6 व्या प्रयत्नात फाउल थ्रो केला.

86.67 मीटर थ्रोसह चेकच्या जाकुब वेदलेच दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 85.44 मीटर थ्रोसह चेकचे वितेस्लाव वेसेली तिसऱ्या क्रमांकावर आहे. नीरजने क्वालिफाइंग राउंडमध्ये 86.65 मीटर थ्रो केला होता आणि आपल्या ग्रुपमध्ये पहिल्या नंबरवर होता.

13 वर्षांनंतर भारताला सुवर्ण:
ऑलिम्पिक स्पर्धेत 13 वर्षानंतर भारताला एखाद्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले आहे. यापूर्वी 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक नेमबाज अभिनव बिंद्राला सुवर्णपदक मिळाले होते. बिंद्राने 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते.

भारताचे आतापर्यंतचे 10 वे सुवर्ण:
ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे हे आतापर्यंतचे 10 वे सुवर्णपदक आहे. भारताने यापूर्वी हॉकीमध्ये 8 आणि नेमबाजीमध्ये 1 सुवर्णपदक जिंकले आहे. अशा प्रकारे, हे भारताचे केवळ दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Tokyo Olympics 2020 Neeraj Chopra won gold medal in javelin throwing news updates.

हॅशटॅग्स

#Olympics 2020(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x