VIDEO | ख्रिस्तियानो रोनाल्डोची ६ सेंकदांची कृती | आणि कोका-कोलाला २९ हजार कोटींचं नुकसान
मुंबई, १६ जून | युरो कप २०२० स्पर्धेत पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या एका कृतीमुळे कोका कोला कंपनीला तब्बल २९ हजार ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे रोनाल्डो पुन्हा चर्चेत आला आहे.
काय आहे प्रकरण:
पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोची पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेला संघाचे व्यवस्थापक फर्नांडो देखील उपस्थित होते. पत्रकार परिषदेत टेबलावर कोका कोलाची बाटली ठेवण्यात आली होती. हे पाहून रोनाल्डो भडकला. त्याने त्या बाटल्या टेबलावरून बाजूला केल्या. त्यानंतर त्याने बाजूला असलेली पाण्याची बाटली हातात घेत ओरडून ‘शीत पेये नाही, पाणी प्यायची सवय करा’ असे पत्रकारांना सांगितलं.
रोनाल्डोच्या त्या कृतीमुळे कोका कोलाचे कसे नुकसान झाले:
ख्रिस्तियानो रोनाल्डोचे चाहते जगभरात आहेत. जगभरातील कोट्यवधी लोक त्याला फॉलो करतात. अशात कोका कोलाचे सेवन करू नका, असा एक प्रकारचा मॅसेजच रोनाल्डोने त्या कृतीतून दिला. त्यामुळे कोका कोला कंपनीचे मोठे नुकसान झाले. कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. कोकचे शेअर्स १.६ टक्क्यांनी घसरले. त्याची किमत २४२ बिलियन डॉलरवरून २३८ बिलियन डॉलरवर आली आहे. भारतीय रुपयात सांगायचे झाल्यास त्यांना २९ हजार ३०० कोटींचे नुकसान झाले.
VIDEO – युरो कप २०२० स्पर्धेत पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या एका कृतीमुळे कोका कोला कंपनीला तब्बल २९ हजार ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे रोनाल्डो पुन्हा चर्चेत आला आहे. pic.twitter.com/sxRrXTRz6P
— महाराष्ट्रनामा न्यूज (@MahaNewsConnect) June 16, 2021
युरो २०२० या स्पर्धेचा कोका कोला अधिकृत स्पॉन्सर आहे. त्यामुळे रोनाल्डोवर काही कारवाई होणार का? हे पाहवं लागेल. दरम्यान, रोनाल्डो फिटनेससाठी कोणत्याही शीतपेय अथवा एरेटेड ड्रिंकपासून दूर आहे. तसेच तो फिटनेससाठी अतिशय काटेकोरपणे डाएट सांभाळतो. दिवसात सहावेळा खाणे, पाच वेळा दीड दीड तासाची झोप, नाश्त्यासाठी मीट, चीज आणि दही, मध्ये भूक लागली तर टोस्ट असा त्याचा डाएट प्लान आहे. त्याच्या या डाएटमुळे तो वयाच्या ३६ व्या वर्षीदेखील मैदानात प्रतिस्पर्धी खेळाडूंवर भारी पडतो.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.
News Title: Top football player Cristiano Ronaldos Coca Cola snub followed by 4 dollars billion drop in market value news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH