22 November 2024 11:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

Under-19 World Cup IND Vs PAK: पाकला घरचा रस्ता, टीम इंडिया फायनलमध्ये

Under 19 Cricket World Cup 2020, India Vs Pakistan

पोटशेफस्ट्रूम: १९ वर्षाखालील आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताच्या युवा संघाने पाकिस्तानच्या युवा संघाचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. पाकिस्तानने दिलेले १७३ धावांचे आव्हान टीम इंडियाने १० गडी राखून सहजपणे पार केले. भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने या महत्त्वाच्या सामन्यात शतकी खेळी साकारली. तर, दिव्यांश सक्सेनाने नाबाद ५९ धावांची खेळी साकारली.

भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानचा डाव १७२ धावांमध्ये आटोपला होता. या आव्हानाचा भारताना सुरेखपणे पाठलाग केला. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला. यशस्वी जैस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांनी दमदार फलंदाजी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकिस्तानचा सलामीवीर हैदर अली आणि कर्णधार रोहैल नाझीर यांची अर्धशतकी खेळी वगळता पाकच्या अन्य फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. त्यामुळे पाकला जेमतेम १७२ धावा करता आल्या.

पाकिस्तानकडून फॉर्मात असलेला मोहम्मद हुरायरा अवघ्या ४ धावा काढून सुशांत मिश्राच्या गोलंदाजीवर माघारी परतला आणि पाकिस्तानला पहिला धक्का बसला. यानंतर रवी बिश्नोईने फआद मुनीरला शून्यावर बाद करत पाकला दुसरा धक्का दिला. यानंतर सलामीवीर हैदर अली आणि कर्णधार रोहिल नाझीर यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत एकूण २३ सामने झाले आहेत. यातील १४ भारताने तर ८ पाकिस्तानने जिंकले आहेत. एक सामना टाय झाला होता. सध्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा यशस्वी जयस्वाल फॉर्ममध्ये आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. वर्ल्ड कपमध्ये भारत पाक ९ वेळा आमने सामने आले आहेत. यात ४ वेळा पाकिस्तान तर ५ वेळा भारताने विजय मिळवला आहे. मागील ३ सामन्यात भारताने पाकिस्तानला लोळवलं आहे.

 

Web Title:  Under 19 Cricket World Cup 2020 India beat Pakistan by 10 wickets and enter in Final.

हॅशटॅग्स

#Indian Cricket Team(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x