22 December 2024 1:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा
x

....ते म्हणतील भारतीय टीम खराब खेलतेय, कारण क्रिकेटर्स ट्विट कॉपी-पेस्ट'मध्ये व्यस्त होते

liberals, Indian crickets, Tweets, Kunal Kamra

मुंबई, ०९ फेब्रुवारी: शेतकरी आंदोलनावरुन सुरु झालेलं सोशल वॉर थांबायचं नाव घेताना दिसत नाही. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याचा इशारा दिल्यानंतर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं आहे.

सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी झालीच पाहिजे. मग मंगेशकर असोत की तेंडुलकर! ‘भारतरत्नांनी’ पदाला साजेसं असंच बोलावं वागावं व लिहावं. फडणवीसांनी भारतरत्नांची बाजू घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर,डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनाचा आदर्श परिपाठ सुद्धा वाचून घ्यावा”, असा हल्लाबोल अमोल मिटकरी यांनी केला. ट्विटरवर त्यांनी हे भाष्य केलं.

दरम्यान, मोदी सरकारच्या बाजूने एकाच प्रकारचे साम्य असणारे ट्विट्स करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे भारतीय विद्यमान आणि माजी क्रिकेटर्सचे होते. दुसरीकडे चेन्नईमध्ये सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट कसोटी सामन्यात भारत बिकट परिस्थितीत आहेत. त्यालाच अनुसरून स्टॅन्डअप कॉमेडियन कुणाल कामराने खोचक ट्विट केलं आहे. त्यात त्याने म्हटलं आहे की, “प्रतीक्षेत आहोत की उदारमतवादी कधी सांगतील की, भारतीय टीम खराब खेलतेय कारण क्रिकेटर्स ट्विट कॉपी-पेस्ट करण्यात व्यस्त होते.

 

News English Summary: The highest number of similar tweets in favor of the Modi government were from current and former Indian cricketers. India, on the other hand, are in dire straits in the England Test against India in Chennai. Following this, standup comedian Kunal Kamara tweeted sharply. “Wait for liberals to start saying India playing badly because crickets were busy copy pasting tweets,” he said.

News English Title: Wait for liberals to start saying India playing badly because crickets were busy copy pasting tweets said Kunal Kamra news updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x