व्यवसाय वाढवण्यासाठी उपाय | तुमचा व्यवसाय चांगला चालण्यासाठी काय करावे? - नक्की वाचा

मुंबई, ०९ जुलै | कोणताही धंदा किंवा उद्योग लहान मोठा नसतो तो उत्तम रित्या चालवण्यासाठी सर्व प्रकारचे न्युनगंड बाजूला सारून जे गरजेचे आहे ते सर्व करण्याची आपली तयारी पाहिजे.आपण प्रचंड कॉन्फिडेंट आहात परंतु धंदा चांगला चालत नाहीये? तुम्ही कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड मनात बाळगत नाहीत तरी देखील धंदा वाढत नाहीये ? धंदा वाढवण्यासाठी उपाय काय करावे ? व्यवसाय कसा वाढवावा ? व्यवसाय कसा करावा ? असे एक न अनेक प्रश्न तुम्हाला पडलेले असतील.
या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा लेख वाचल्यावर नक्की मिळतील. आणि हे उपाय केल्यावर तुम्हाला नक्कीच फायदा होईल:
धंदा वाढवण्यासाठी उपाय / धंदा वाढवण्याचे मार्ग:
१) तुमचा व्यवसाय डिजिटल करा:
आताचा काळ हा डिजिटल आहे. बदलत्या काळानुसार तुम्हाला तुमचा व्यवसायातील काही गोष्टी देखील बदलणे गरजेचे आहे.आता लोक दुकानात जाण्यापेक्षा घरात बसून वस्तू खरेदी वर जास्त भर देतात.
धंदा वाढवण्यासाठी उपाय म्हणून तुम्हाला सुद्धा तुमचा व्यवसाय डिजिटल करावा लागेल.तुमचा व्यवसाय डिजिटल करण्यासाठी खाली दिलेल्या काही गोष्टी करा.त्याचा नक्कीच तुमचा धंदा चांगला चालण्यासाठी उपयोग होईल.
Google My Business वर रजिस्टर करा:
तुमचा व्यवसाय मोठ्या करण्यासाठी सुरवातीला तुम्हाला तुमच्या व्यवसायाची तुमच्या भागामध्ये ओळख निर्माण करावी लागेल.तुमच्या जवळपास च्या लोकांना तुमचा व्यवसाय माहीत झाला पाहिजे. Google My Business वर रजिस्टर केल्यामुळे तुमचा व्यवसाय गूगल मॅप वर दिसेलच,पण त्याच बरोबर बऱ्याच लोकांना गूगल तुमचा व्यवसाय सुचवेल.
उदाहरण: जर तुमचे शाकाहारी व मांसाहारी हॉटेल आहे आणि तुम्ही Google My Business वर रजिस्टर केलेलं असेल तर ज्या वेळी कोणी व्यक्ती तुमचे हॉटेल ज्या शहरामध्ये तिथूनच गूगल वर शाकाहारी जेवण असे search करेल त्यावेळी गूगल तुमचा व्यवसाय त्यांना सुचवेल. Google My Business वर तुम्ही रजिस्टर केल्यास तुमचा व्यवसाय वाढण्यासाठी निश्चित फायदा होईल.
व्यवसायाची वेबसाईट बनवा:
आता लहान मोठे सगळ्याच उद्योगांची वेबसाईट आहे.असे काही नाही की तुमचा व्यवसाय लहान आहे मग वेबसाईट कशाला बनवायची. तुमचा व्यवसाय कसला ही असुद्या त्याची जर वेबसाईट असेन तर त्याची एक वेगळीच छाप आपल्या गिऱ्हाईकावर आपन सोडण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
वेबसाईट बनवण्यासाठी तुम्हाला कोणा वेब डिजाईनर कडे जाण्याची गरज नाहीये तुम्ही स्वतः कमी पैशात आणि घर बसल्या देखील चांगली वेबसाईट बनवू शकता.२०००-३००० रुपया मध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाची एक चांगली वेबसाईट स्वतः बनवू शकता. GoDaddy किंवा BIGROCK सारख्या वेबसाईट चा वापर करून तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्यवसायाची उत्तम वेबसाईट बनवू शकता.
सोशल मीडियाचा वापर:
हल्लीच्या युगात प्रत्येक जण सोशल मीडिया वापरत आहे,तुमचे जवळ पास सर्वच कस्टमर हे सोशल मीडिया वापरत असतील. आणि जर मग आपले सर्व कस्टमर सोशल मीडिया वर असतील तर मग तुमचा व्यवसाय देखील सोशल मीडिया वर हवाच.
तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या नावाने फेसबुक,इन्स्टाग्राम,ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया वेबसाईट वर अकाउंट उघडले पाहिजे आणि ते रोज रोजच्या रोज हाताळले पाहिजे असे केल्याने तुम्ही तुमच्या कस्टमरच्या कळत न कळत संपर्कात असता ज्याचा निश्चित परिणाम तुमच्या व्यवसायाच्या वृद्धी मध्ये होतो. तुमच्या व्यवसायाचे व्हिडिओ तुम्ही जास्त करून सोशल मीडिया अकाउंट वर शेअर करा जेणेकरून तुमच्या पेजची लोकांशी Engagement वाढेल.
CRM (Customer Relationship Management) सॉफ्टवेअर:
तुमचा व्यवसाय कोणता आहे त्यावरुन शक्य असल्यास CRM software वापरा. तुमच्या कस्टमर सोबत तुम्ही रेलशनशीप बनवणे गरजेचे आहे तुमचे त्यांच्या सोबत बॉंडींग होणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला हे सॉफ्टवेअर मदत करते.
आता जवळ पास सर्वच उत्तम चालणारे व्यवसाय हे CRM सॉफ्टवेअर वापरत आहेत. तुमच्या कस्टमर ला सण किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे किंवा तुमच्या व्यवसायातील विविध ऑफर तुमच्या कस्टमर ला मेसेज करून कळवणे, या सारखे अनेक फायदे CRM सॉफ्टवेअर वापराचे आहेत.
२) कच्चा मालातील नफा वाढवा:
तुमच्या व्यवसाया साठी लागणारा कच्चा माल हा चांगल्या गुणवत्ते सोबतच स्वस्त देखील असला पाहिजे आणि अश्या प्रकारचा माल हा तुम्ही जिथे हा माल बनवला जातो तिथूनच जर होलसेल किंमती मध्ये विकत घेतला तर तुमचा नफा नक्की वाढेल. फक्त आपल्या कस्टमर ला विकलेल्या उत्पादनातूनच नाही तर तुम्ही विकत घेणाऱ्या कच्चा मालावर देखील तुम्ही नफा वाढवू शकता. खाली काही वेबसाईट दिल्या आहेत ह्या वेबसाईट वर तुमचे अकाउंट नसेल तर आजच ओपन करा.
Amazon Business Account:
ऍमेझॉन च्या ह्या सर्विस मध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी लागणाऱ्या वस्तू होल सेल किंमतीत मिळतील.तसेच तुम्हाला जवळ जवळ २८% GST Examption देखील मिळेल.Amazon चे बिजनेस अकाउंट कसे चालू करायचे ह्या बाबत सर्व माहिती हवी असल्यास खालील बटन वर क्लिक करा.
अलीबाबा AliBaba:
या वेबसाईट वरन तुम्ही जास्त प्रमाणात उत्पादने खरेदी करू शकता आणि ते पण एकदम कमी किंमती मध्ये. या वेबसाईट वरून तुम्ही एखादे उत्पादन बनवणाऱ्या कंपनी सोबत डायरेक्ट व्यवहार करू शकता.ह्या वेबसाईट वर रजिस्टर करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
Ali Express:
अलीबाबा प्रमाणेच या वेबसाईट वर देखील तुम्ही डायरेक्ट manufacturer सोबत व्यवहार करू शकता.या वेबसाईट वर रजिस्टर करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
३) गिऱ्हाईका सोबतची तुमची वागणूक:
आपण आपल्या गिऱ्हाईक सोबत कायम अदबीने वागले पाहिजे.तुमचे उत्पादन किंवा सेवा विकण्याच्या आधी आणि विकल्या नंतर पण आपण त्यांचा सोबत अदबीनेच बोलले आणि वागले पाहिजे.असे केल्यास ते तुम्हाला कायम लक्षात ठेवतील आणि तुमच्या व्यवसायाचा तोंडी प्रचार देखील करतील.त्यांचे काम एक वेळ थोडे उशिरा झाले तरी चालेल पण त्यांच्यासोबत आपण नम्रतेनेच बोलले पाहिजे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: How to grow your business guidance in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK