5 November 2024 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO
x

एखादा व्यवसाय करू इच्छित असला तर 'मदर डेअरी सफल' व्यवसाय करू शकता | वाचा संपूर्ण माहिती

How to start Mother Dairy franchise

मुंबई, २३ जुलै | आज आम्ही तुम्हाला एका व्यवसायाबाबत सांगणार आहोत ज्यामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून चांगली कमाई करता येणे शक्य आहे. डेअरी प्रोडक्ट बनवणारी कंपनी मदर डेअरी बरोबर व्यवसाय सुरू करण्याची ही संधी आहे. फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रायव्हेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी त्यांची फ्रँचायझी ऑफर करत आहे. ही फ्रँचायझी घेऊन तुम्ही मोठा व्यवसाय उभा करू शकता. डेअर प्रोडक्ट ही रोजच्या वापरातील वस्तू आहे. त्यामुळे यामध्ये नुकसान होण्याची शक्यता फार कमी आहे. जर तुम्ही गुंतवणूक करून फ्रँचायझी बिझनेस करण्याच्या विचारात असाल तर मदर डेअरी एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला 5 ते 10 लाखांची गुंतवणूक करावी लागेल.

या प्रोडक्टमधून करू शकता कमाई:
भारतातील कृषी उद्योगातील हे सर्वात मोठे फ्रँचायझी नेटवर्क आहे. नुकतेच कंपनीने पहिल्यांदा बेकरी सेगमेंटमध्ये उतरण्याची तयारी केली आह. कंपनीने तीन प्रकारचे ब्रेड लाँच केले आहेत. कंपनी दूध, दुधापासून बनलेलेल प्रोडक्ट्स आणि अन्य काही खाद्यपदार्थ बनवते आणि विकते.

डेअरी उत्पादनांव्यतिरिक्त कंपनी फले, भाजी, खाद्यतेल, खाद्यपदार्थ, लोणचे, फळांचे रस, जॅम यांसारख्या वस्तू बनवते किंवा विकते. कंपनीचे जवळपास 2500 आउटलेट आहेत आणि हळूहळू याचा विस्तार करण्याच्या विचारात ‘मदर डेअरी’ आहे.

याप्रकारे आखा योजना:
मदर डेअरीने देशभरात 2500 आउटलेट्स उघडले आहेत. ही फ्रँचायझी घेण्यासाठी तुम्हाला एका चांगल्या गुंतवणुकीची आवश्यकता भासेल. ही गुंतवणूक तुम्ही निश्चित केलेल्या जागेनुसार बदलणारी असेल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला साधारण 5 ते 10 लाखांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये ब्रँड फीच्या स्वरूपात 50,000 रुपये वेगळे द्यावे लागतील. कंपनीकडून यामध्ये कोणतीही रॉयल्टी फी घेतली जात नाही.

किती होईल कमाई?
डेअरी प्रोडक्टच्या व्यवसायामध्ये पहिल्याच दिवसापासून कमाईची सुरुवात होते. मदर डेअर फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मदर डेअरी डिस्ट्रीब्यूटरशीप मार्जिन अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिल्याच वर्षी गुंतवणुकीमध्ये 30 टक्के रिटर्न मिळू शकतो. गुंतवणूक केलेल्या पूर्ण रकमेची परतफेड होण्यासाठी साधारण 2 वर्षाचा काळ जाऊ शकतो. मदर डेअरीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर साधारण दर महिन्याला 44,000 हजार रुपयांचा फायदा होऊ शकतो.

कोणती कागदपत्र आवश्यक?
ओळख प्रमाणपत्रासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटर आयडी द्यावा लागेल. तर पत्त्याच्या प्रमाणपत्रासाठी रेशन कार्ड, वीजबिलाची कॉपी द्यावी लागेल. त्याचप्रमाणे बँक खात्याची माहिती, फोटोग्राफ, ई-मेल आयडी, फोन नंबर, प्रॉपर्टीची कागदपत्र आणि एनओसी सर्टिफिकेट द्यावे लागेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to start Mother Dairy franchise details in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#startup(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x