१२ महिने संधी असलेला हॉटेल व्यवसाय कसा करावा ? | नक्की वाचा आणि विचार करा
मुंबई, ०८ जुलै | हॉटेल व्यवसाय कसा करावा ? असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो। कारण हॉटेल बिझनेस हा एक एव्हरग्रीन व्यवसाय म्हणजेच कोणत्याही सीजन मध्ये चालणारा बिजनेस आहे। आणि त्यातून चांगला नफा मिळतो. भारतामध्ये हॉटेलचा व्यवसाय खुप जोरात वाढतोय. तसा विचार केला तर हा एक खुप जुना व्यवसाय आहे. तरी पण हा व्यवसाय वाढतच चाललाय. मित्रांनो, आजकालच्या काळात चांगली नौकरी मिळवणं हे एक मोठं आव्हान आहे. एका पोस्ट साठी किती तरी लोकं प्रयत्न करत असतात. आज प्रतिस्पर्धा तर इतकी वाढली आहे की, किती तरी डॉक्टर, इंजिनिअर सुद्धा बिना नौकरी चे बसलेले आहेत.
म्हणून परिस्थिती पाहता, मोठ्या पदव्या हातात घेतलेले, किती तरी शिकले सावरलेले लोकं सुद्धा, नोकरीचा नाद सोडून व्यवसायात आपलं नशीब आजमावून पाहताय. हॉटेल व्यवसाय पण,आज खुप लोकं करत आहेत. आजकल बाहेर हॉटेल मध्ये जाऊन खायचं trend फार वाढलं आहे. एरवी तर लोकं कुटुंबासोबत बाहेर जेवायला जातातच शिवाय, Birthday party, Anniversary, kitty party इत्यादी खुपशी लहान मोठी समारंभं, घरी घाट घालाय पेक्षा, लोकं हॉटेल मध्ये जाऊनच मजा करतात. म्हणजे, हॉटेल व्यवसाय हा आज व्यवसायाचा एक चांगला पर्याय आहे.
हॉटेल व्यवसाय कसा करावा:
मित्रांनो, स्वतः चं हॉटेल सुरू करणं हे वाटतं तितकं सोपं काम नाही आहे. सांगण्याचा अर्थ असा की, तुम्ही सुद्धा जर का हॉटेल व्यवसाय मध्ये आपलं नशीब आजमावून पाहताय तर, तुम्ही नक्कीच प्रयत्न करा पण हे ही सत्य आहे की बाकी व्यवसायांपेक्षा, हा व्यवसाय खुप जिम्मेदारी पूर्वक आणि पूर्ण लक्षं देऊन करायचा आहे.
फूडच्या रिलेटेड व्यवसाय म्हटलं की रिस्क सुद्धा आलीच. पण घाबरु नका मित्रांनो, जर तुम्हाला हॉटेल व्यवसाय करायचाच आहे, तुम्हाला ह्यात interest आहे आणि तुमचा इरादा ही पक्का आहे तर चला मग पुढे. आणि जर का तुमच्या कडे हॉटेल व्यवस्थापनची पदवी असेल तर सोने पर सुहागा. तर मित्रांनो, आजच्या ह्या लेखामध्ये आपण पाहुयात की हॉटेल व्यवसाय कसा सुरु करायचा आणि त्या साठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत.
मित्रांनो, जसं की आपण पाहिलं की हॉटेल व्यवसाय सुरू करण्यापूर्वी खुप गोष्टी लक्षात ठेवायची गरज आहे. खुप नियोजन आणि स्ट्रॅटेजी तैयार करावी लागते. त्या साठी सगळ्यात आधी तुम्ही विचार करा की तुम्हाला कोणत्या प्रकारची हॉटेल सुरू करायची आहे, शाकाहारी, मांसाहारी किंवा दोघीही प्रकारची. त्यानंतर तुम्हाला फक्त स्नॅक्स ठेवायचं आहे की पूर्ण जेवण. हे ठरवल्या नंतर, मग बाकीच्या गोष्टी लक्षात घेऊन पुढे पाऊल टाका. त्या गोष्टी कोणत्या आहेत चला सविस्तर पाहुया.
1. आर्थिक नियोजन:
कोणताही व्यवसाय सुरू करताना, सगळ्यात महत्वपूर्ण हे पाहणं आहे की त्यात खर्चं किती येईल.आणी तुम्ही तो खर्च उचलायला सक्षम आहात का. त्या नंतर तुम्ही आवश्यक वस्तुंची list तैयार करा आणि अंदाजा घ्या की हॉटेल व्यवसाय मध्ये सुरुवातीला किती खर्च येतो. कारण हॉटेलमध्ये आवश्यक सुविधा, सजावट, विविध प्रकारची छोटी मोठी भांडी, गैस, फ्रीज, बसायची व्यवस्था, ग्रोसरी इत्यादी अनेक वस्तू अगदी अत्यंत आवश्यक आहेत. तर हा सगळ्यात मोठा खर्च झाला.
2. स्टाफ:
तुम्हाला आपल्या हॉटेल मध्ये प्रशिक्षित स्टाफ ठेवावा लागेल जे हॉटेल मध्ये येणाऱ्या ग्राहकाला उत्तम सेवा देऊ शकतात. आणि किचनमध्ये सुरुची पूर्ण स्वयंपाक बनवणारे शेफ असणं पण आवश्यक आहे.
3. ठिकाण आणि हॉटेलचं नाव:
ठिकाण, म्हणजे तुमचं हॉटेल कोणत्या भागात आहे, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. तुमचं हॉटेल वर्दळीच्या भागामध्ये असो किंवा थोड्या निवांत जागेत, त्यानं आजकल विशेष काही फरक नाही पडत. कारण काही लोकांना खुप वर्दळीच्या भाग आवडतो तर काही जण, निवांत जागा शोधतात. तुमच्या हॉटेलचा स्टाफ, सर्विस आणि जेवण जर बाकीच्या हॉटेल्स पेक्षा हटके आणि बेस्ट असेल तर तुमचं हॉटेल कुठे ही चालू शकतं. तसेच तुमच्या हॉटेलच नाव सुद्धा फूडशी संबधित, थोडं वेगळं पण अर्थपूर्ण असायला पाहिजे जे लोकांना ऐकूनच छान वाटेल.
4. सजावट आणि स्वच्छता:
अधिकांश लोकं फार सौंदर्य प्रेमी असतात, आणि सुंदर आणि मोहक दिसणारी प्रत्येक वस्तू त्यांना चटकन आवडते. तर जर तुमच्या हॉटेलचं बाहेरील आणि आतील सजावट सुंदर आणि आकर्षक असेल तर लोकं नक्कीच तुमच्या हॉटेल मध्ये येतील. तुमच्या हॉटेल मध्ये तुम्ही एखादी छानशी थीम सुद्धा ठेऊ शकतात.
शिवाय लहान मुलांसाठी काही तरी आकर्षक ठेवले तर त्यांना व्यस्त ठेवता येईल आणि त्यांच्या पालकांना नीट जेवणाचा आस्वाद घेता येईल. ह्या साठी पण तुमच्या हॉटेल मध्ये गर्दी वाढेल. खाण्याचा व्यवसाय म्हंटला की स्वच्छता तर पाहिजेच पाहिजे. तुमचं हॉटेल सुंदर आणि स्वच्छ असणं अत्यावश्यक आहे. हे ग्राहक भेटीच्या दृष्टीने तर महत्वाचं आहेच पण आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा महत्वपूर्ण आहे.
5. मेनू:
आज तुम्ही ज्या हॉटेलमध्ये जाल त्या हॉटेल मध्ये एक सारखा मेनू आणि एक सारखं जेवण मिळतं. लोकं कधी कधी तोच तो पदार्थ आणि सेम taste खाऊन कंटाळून जातात पण पर्याय नसल्याने काही करु नाही शकत. तर तुमच्या हॉटेल मध्ये उत्तम टेस्टच्या नियमित पदार्थांसोबतच जर तुम्ही तुमच्या काही विशेष आणि हटके डिश केल्या तर तुमचं हॉटेल नक्कीच छान चालेल. तर मेनू हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे.
अजुन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, कोणताही व्यवसाय सुरू करताना आधी आपल्याला सरकार कडून मान्यता लायसेन्स घ्यावं लागतं, तसच तुमच्या हॉटेल व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पण तुम्हाला सरकार कडून परवानगी घ्यावी लागेल. हे लाइसेंस मिळवायला वेळ लागु शकतो तर तुम्ही सर्व नियोजन आणि तैयारी करतानाच सरकार कडे लायसेन्ससाठी अर्ज देऊन ठेवा.
तर मित्रांनो, आज आपण पहिलं की, हॉटेल व्यवसाय कसा सुरु करावा. तर कसली वाट पाहताय मग, आपला हॉटेल व्यवसाय सुरू करा आणि खूप पैसे कमवा. पण खाद्य व्यवसाय आहे तर लोकांच्या आरोग्याचा विचार प्रथम प्राथमिकता असु द्या आणि इतर सगळ्या गोष्टींकडे पण बारीक लक्षं ठेवा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: How to start own hotel business guidance in Marathi news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो