22 January 2025 1:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

Startups | बटाटा प्रक्रिया उद्योग | मराठी तरुणांना परवडेल असा कायम चलती असलेला उद्योग - वाचा माहिती

How to start Potato chips business

मुंबई, ०६ जुलै | बटाटा प्रक्रिया उद्योग हा एक शेतकरी किंवा शेतकरी गट सहजपणे सुरू करू शकतात असा व्यवसाय आहे. आपल्याला माहीतच आहे की बटाट्यापासून चिप्स, वेफर्स म्हणून चांगल्या प्रकारे शेतकरी नफा कमावू शकतात. त्यासाठी काही यंत्राची आवश्यकता असते. याबद्दलची तपशीलवार माहिती या लेखात आपण घ घेऊ.

जर बाजाराचा विचार केला तर चिप्स, वेफर्स बनविणारे आणि कंपन्या सध्या आहेत. परंतु शेतकऱ्यांनी स्वादिष्ट चिप्स, वेफर्स बनवले तर स्थानिक पातळीवरील बाजारपेठ सहज अभ्यास करणे शक्य होईल. त्यासाठी आपल्याला स्थानिक पातळीवर बटाटा उत्पादन आणि त्यावर प्रक्रिया उद्योगाची उभारणी करणे आवश्यक आहे.

किती लागेल भांडवल:
* जर या उद्योगांसाठीच्या भांडवलाचा विचार केला तर छोट्या स्तरावर हा उद्योग सुरू करण्यासाठी कमीत कमी एक ते दीड लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असतो.
* चिप्स चे दोन प्रकार असतात तळलेले चिप्स आणि दुसरे भाजलेले चिप्स. त्यांचे चवीनुसार साधे चिप्स, खारवलेले चिप्स, मसालेदार चिप्स अशा तीन प्रकारात वर्गीकरण करता येते.
* आपण तयार केलेली चिप्स हे स्थानिक बाजारात, किरकोळ विक्रेते, साकळी विक्रेते, मॉल किंवा ऑनलाइन रिटेल स्टोअर मार्फत हे तयार केलेल्या चिप्स आपण विकू शकतो.
* या उद्योगामध्ये जर व्यवस्थित विक्रीचे नियोजन केले तर शेतकऱ्यांना बटाट्यापासून लाखोंची कमाई करता येऊ शकते.

या उद्योगासाठी लागणारी प्रमुख यंत्रे:

साल काढण्याचे यंत्र:
* चिप्स तयार करण्यासाठी अगोदर बटाटे स्वच्छ धुऊन त्यांची साल काढावी लागते. हे साल काढण्यासाठी बाजारात विविध यंत्र उपलब्ध आहेत.
* या यंत्राच्या तळाशी गोलाकार चकती असते. ही चकती बटाटा वरून फिरून साल निघून वेगळी होते.
* या चकतीचा व्यास 14 इंच, जाडी 0.5 इंच असते. साल काढलेले बटाटे आपोआप पुढे सरकवले जातात.
* या यंत्रात सिंगल फेज वर चालणारी 1 एचपी क्षमतेचे मोटर असते. यंत्राचे वजन साधारणतः 55 किलो आहे.
* या यंत्राद्वारे एका वेळेस दहा किलो बटाटाची साल काढली जाते. यंत्राची किंमत सोळा हजार पासून पुढे आहे.

बटाटा कापण्याचे यंत्र:
* साल काढलेले बटाट्यापासून छोटे छोटे गोलाकार काप काढण्यासाठी हे यंत्र उपयुक्त आहे.
* या यंत्रात सिंगल फेज मोटर वापरलेली असते.
* एका तासाला साधारण 200 किलो बटाट्याची काप केले जातात.
* याची किंमत वीस हजार पुढे आहे.

ड्रायर:
* बटाट्याचे चिप्स दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यातील पाणी काढणे आवश्यक असते. म्हणजे ते वाळवणे गरजेचे आहे. त्यासाठी ड्रायरचा उपयोग केला जातो.
* हे यंत्र बटाट्याच्या काप मधील पाणी शोषून घेते. हे शोषलेले पाणी आतील गोलाकार भांड्यात साठवले जाते. दर काही टप्प्यानंतर हे भांडे काढून त्यातील पाणी काढून टाकावे.
* एका वेळेला दहा किलोच्या कापचे पाणी काढता येते.या यंत्रामध्ये 2 एचपी ची सिंगल फेज मोटर चा वापर केलेला असतो. सुमारे 26 हजार पासून पुढे यंत्राची किंमत असते.

तळण यंत्र:
* वाळविलेले चिप्स या यंत्राद्वारे तळले जातात.
* तेल गरम करण्यासोबतच हे तेल सातत्याने फिरते ठेवले जाते. त्यामुळे तेल खराब होत नाही.
* त्याच प्रमाणे तळाशी जमा होणारा चिप्सचा मलदा काढून टाकला जातो.
* यंत्र पूर्णपणे ऑटोमॅटिक सिस्टम वर चालते. एका तासाला सुमारे 20 ते 25 किलो चिप्स तोडले जातात.
* याची किंमत जवळपास पन्नास हजारांच्या पुढे आहे

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to start Potato chips business details in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#startup(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x