16 April 2025 11:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA
x

शेअर ट्रेडिंग एक उत्तम व्यवसाय होऊ शकतो का ? | नक्की वाचा आणि विचार करा

Share Market Trading business

मुंबई, ०८ जुलै | आज प्रत्येक जण विचार करतोय एक कोणतातरी बिजनेस चालू करावा की त्यात मला थोडाफार नफा होईल मला एक दुसरे उत्पनाचे साधन भेटेल. पण समजत नाही कोणता बिजनेस करू कारण सगळ्याच बिजनेस मध्ये खूप स्पर्धा आहे आपण त्या बिजनेस मध्ये यशस्वी होऊ का नाही हे विचार सतत येत असतात.

बिजनेसच करायचा असेल तर शेअर ट्रेडिंग का नाही? शेअर ट्रेडिंग सारखा उत्तम बिजनेस कोणता नाही पण शेअर ट्रेडिंग म्हटलं की लगेच मनात शंका येते अरे त्यात खूप जोखीम आहे, आपले कॅपिटल चे नुकसान होऊ शकते. पण असा कोणता बिजनेस आहे त्यात जोखीम नाही?, सर्व बिजनेस आहेत त्यात जोखीम आहे. आता तुमची नोकरी देखील किती दिवस टिकले हे देखील कोण खात्रीशीर सांगू शकत नाही. शेअर बाजारात योग्य प्रकारे काम केले तर आपण आपली जोखीम कमी करू शकतो आणि चांगले प्रॉफिट मिळवू शकतो.

कोणताही व्यवसाय करा सुरवातीला थोडे नुकसान होतेच तसेच व्ययसायात जम बसायला आणि प्रॉफिट व्हायला थोडा वेळ लागतो तसेच शेअर ट्रेडिंगच्या व्यवसायात देखील आहे इथे आपल्याला थोडा वेळ लागेल, मेहनत करावी लागेल, तरच आपण ह्या व्ययसायात यशस्वी होऊ शकतो. शेअर ट्रेडिंग म्हणजे झटपट पैसे कमवण्याचा मार्ग नाही, पण एक पैसे कमवून देण्याचा उत्तम मार्ग आहे हे नेहमी लक्षता घ्या

शेअर ट्रेडिंग चे फायदे:
शेअर ट्रेडिंग चा सर्वात मोठा फायदा जो मला वाटतो तो म्हणजे शेअर बाजारात तुम्ही कधीही येऊ शकता किंवा कधीही तुमची गुंतवणूक बंद करू शकता म्हणजे इतर व्यवसाय सारखे नाही इथे तुमचे कॅपिटल अडकून नाही ठेवत. आपल्याला हवी तेवढीच गुंतवणूक करू शकतो जर आपल्यला कमी गुंतवणूकी पासून सुरवात करायची असेल तरी देखील आपण हा व्यवसाय करू शकतो. शेअर ट्रेडिंग हे कोणीही करू शकतो ह्या साठी कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाची अट नाही पण शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी ह्याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.

तुम्ही शेअर ट्रेडिंग फुल टाईम किंवा पार्ट टाईम म्हणुन करू शकता. तुम्ही तुमचे इतर व्यवसाय किंवा नोकरी सांभाळून देखील शेअर ट्रेडिंग करू शकता. तुम्ही तुमच्या घरात बसून देखील ट्रेडिंग करू शकता किंवा कुठे ही गेलात तरी कुठूनही हा व्यवसाय करू शकता फक्त इंटरनेट आवश्यक आहे. शेअर ट्रेडिंग च्या व्यवसाय मध्ये पारदर्शकता असते इथे उधारी चा प्रश्नच येत नाही जे काही नुकसान किंवा नफा होईल ते त्याच दिवशी आपल्याला समजते व आपल्या खात्यात तसे अपडेट होतात

शेअर ट्रेडिंग चे अनेक फायदे आहेत, पण तुम्ही फक्त नुकसान होईल ह्या एका विचाराने शेअर मार्केट गुंतवणूक करत नसाल तर तुम्ही खूप मोठी संधी गमावत आहेत असे मला वाटते. जो पर्यंत तुम्ही सुरवात करत नाहीत तो पर्यंत तुम्हला त्याचा अंदाज येणार नाही . एकदा सुरवात करून तर बघा आणि ह्या बाबत काही मदत लागली तर आम्ही करू आम्हला संपर्क करा

(शेअर बाजारात जोखीम असते आणि जोखीम घेण्याची तयारी असेल तरच शेअर बाजारात गुंतवणूक करावी)

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Share Market Trading business guidance in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#startup(21)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या